Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवी यांच्या अखेरच्या क्षणातील एक फोटो होतोय व्हायरल; पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 19:41 IST

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आठवणींना अजूनही उजाळा दिला जात आहे. सध्या श्रीदेवी यांचा असाच एक फोटो समोर येत असून, सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची जाऊबाई म्हणजेच अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूरसोबतचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो अनिल कपूरचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नातील आहे. याच लग्न समारंभाच्या दोन दिवसांनंतर श्रीदेवी यांचे दुबई येथे अपघाती निधन झाले. त्यामुळे हा फोटो श्रीदेवी यांच्या अखेरच्या क्षणाचा असल्याचे बोलले जात आहे. या फोटोमध्ये दोघीही ट्रेडिशनल ड्रेसमध्ये पोज देताना बघावयास मिळत आहेत. फॅमिली वेडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या या दोघींनी गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. श्रीदेवी यांनी सिल्व्हर काठ असलेला पिंक कलरचा ड्रेस परिधान केला होता तर सुनीताने कुंदन ज्वेलरीसह डार्क पिंक सूट घातला होता. अभिनेत्री नीतू सिंगनेदेखील श्रीदेवी यांच्या आठवणीनिमित्त आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. हा फोेटो चांदनी चित्रपटातील असून, त्यामध्ये श्रीदेवी आणि ऋषी कपूर एका गाण्यावर थिरकताना बघावयास मिळत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नीतू सिंगने लिहिले की, ‘जेव्हा लोकांनी म्हटले आमच्या आयुष्यात रोमान्स परतला. माझा फेव्हरेट चित्रपट चांदनी’.  दरम्यान, श्रीदेवी पती बोनी कपूर आणि लहान मुलगी खुशी कपूरसोबत दुबई येथे भाचा मोहित मारवाहच्या लग्नात गेली होती. लग्नातील सेलिब्रेशनचे बरेचसे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. लग्नानंतर श्रीदेवी दुबई येथील हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. परंतु दुर्दैवाने त्यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीवर विश्वास ठेवणे अजूनही त्यांच्या चाहत्यांना अवघड होत आहे.