Join us

एकेकाळी शर्लिन चोप्राला करावा लागला होता डिप्रेशनचा सामना, खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 08:00 IST

अभिनेत्री शर्लिन चोप्रालाही एकेकाळी डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. त्यातून ती कशी बाहेर पडली याबद्दल तिने सांगितले आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून कलाकार व त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. सुशांतने डिप्रेशनमध्ये इतक्या टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्रालाही एकेकाळी डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. त्यातून ती कशी बाहेर पडली याबद्दल तिने सांगितले आहे.शर्लिनने सांगितलं की, '2005 मध्ये माझ्या वडिलांचं कार्डियक अटॅकने निधन झालं. ते डॉक्टर होते. ज्यावेळी मी माझ्या वडिलांना गमावले. त्यावेळी मी कॉलेजमध्ये होती. आई-वडिलांशिवाय कसे राहायचे हे मला माहित नव्हते. काही वर्षांनी मला जाणवलं की, एखाद्या व्यक्तीमध्ये स्वत:ची किंमत किंवा स्वत:बाबतचं प्रेम बाहेरुन निर्माण होत नाही, तर स्वत:शीच बोलून ते आपण मिळवू शकतो. हळूहळू मी स्वत:वर प्रेम करु लागली. त्यानंतर मला जाणवू लागले की, जगात वाईट लोक आहेत, परंतु ही जागा वाईट नाही. ही अतिशय सुंदर जागा आहे.

दोन वर्षांपूर्वी मी स्मोकिंग सोडले. त्यानंतर मी दररोज वर्कआऊट करण्याचा निर्णय घेतला आणि स्वस्थ जीवन जगण्यास सुरुवात केल्याचे शर्लिन म्हणाली.

शर्लिन तिच्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाते. प्लेबॉय मॅगझिनमध्ये काम करणारी ती भारतातील पहिली महिला होती. शेवटची ती कतार या रॅप व्हिडिओमध्ये दिसली होती, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले होते.

वेब सीरिज, शॉर्ट फिल्म आणि ग्लॅमरस व्हिडिओंमध्ये छाप पाडणारी शार्लिन सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कन्टेन्टसाठी काम करत आहे. 

टॅग्स :शर्लिन चोप्रा