Salman Khan:बॉलिवूडचा दबंग खान अशी ओळख असलेला अभिनेता सलमान खानची चाहत्यांमध्ये कायम क्रेझ पाहायला मिळते. सलमान खानने आयुष्यात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपट बॅटल ऑफ गलवान मुळे चांगलाच चर्चेत आहे. परंतु, तुम्हाला माहितीये का सलमान खानने आयुष्यात अनेक चित्रपट नाकारले आहेत. ज्याचा त्याचा करिअरला चांगला फायदा झाला असता.त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपट बनवला आणि या सिनेमासाठी शाहरुख खानला कास्ट करण्यात आलं.
या चित्रपटाचं नाव बाजीगर आहे. सुभाष के. झा यांना दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत सलमान खानने हे तपशील उघड केले आणि हे चित्रपट नाकारण्यामागची कारणे सांगितली.सलमान एका मुलाखतीत म्हणाला होती की, तो असा कोणताही चित्रपट स्वीकारणार नाही जो चुकीचा वेगळा मेसेज जाईल. शिवाय त्या काळात सलमानचे संजय लीला भन्साळी यांच्याशी एक चांगली बॉण्डिंग होती.त्याने याआधी त्यांच्यासोबत 'खामोशी' आणि 'हम दिल दे चुके सनम' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र, तेव्हा सलमान आपल्या चित्रपटांच्या निवडीबाबत खूप स्पष्ट होता.
'बाजीगर' हा चित्रपट १९९३ साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये शाहरुख खानने नकारात्मक भूमिका साकारली होती.या चित्रपटात शाहरुखने काजोल आणि शिल्पा शेट्टी या दोघींसोबत स्क्रिन शेअर केली होती. हा सिनेमा आजही लोक तितक्याच आवडीने बघतात. या चित्रपटाची गाणी आजही लोकप्रिय आहेत आणि तो त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. केवळ ३ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल १५ कोटी रुपयांची प्रचंड कमाई केली.
Web Summary : Salman Khan declined 'Baazigar' due to its negative message. Shah Rukh Khan then starred, making it a blockbuster. Despite a 3 crore budget, the film earned 15 crore.
Web Summary : सलमान खान ने नकारात्मक संदेश के कारण 'बाज़ीगर' को मना किया। शाहरुख खान ने अभिनय किया, और यह ब्लॉकबस्टर बन गई। 3 करोड़ के बजट में फिल्म ने 15 करोड़ कमाए।