Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा ‘रॉक द पार्टी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 02:04 IST

बॉम्बे रॉकर्सची मुख्य ओळख म्हणजे ‘रॉक द पार्टी’ हेच संगीत घेऊन रॉकर्स पुन्हा चाहत्यांच्या सेवेत येत आहेत.

बॉम्बे रॉकर्सची मुख्य ओळख म्हणजे ‘रॉक द पार्टी’ हेच संगीत घेऊन रॉकर्स पुन्हा चाहत्यांच्या सेवेत येत आहेत.  या अल्बमला तब्बल १३ वर्षे झाली तरी चाहत्यांच्या मनात त्याची जादू कायम आहे. आता पुन्हा ते नव्या स्वरुपात आले आहे.  महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॉन अब्राहमच्या ‘रॉकी हॅण्डसम’ या नव्या चित्रपटाचा एक भाग म्हणून हे गाणे आले आहे. या गीताच्या व्हिडिओमध्ये नवतेज सिंग रेहाल आणि थॉमस सार्दोॅर्फ, नोरा फतेही आदी दिसणार आहेत.एकीकडे हे गाणे सुरू असतानाच जॉन अब्राहम आणि शरद केळकर दुसºया दृश्यात गंभीर अभिनय करताना दिसणार आहेत.  या गाण्यामुळे चाहत्यांच्या जुन्या समृती नक्कीच जाग्या होणार आहेत. निशिकांत कामत दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे कोरियन थ्रिलर ‘ द मॉन फ्रॉम नोव्हेअर’ या चित्रपटाचा रिमेक आहे. श्रुती हसन हिची यात  प्रमुख भूमिका आहे.