Join us

पुन्हा एकदा ऋषी कपूर आणि जुही चावला दिसणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 11:35 IST

ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्या जोडीने सिल्वर स्क्रीन चांगलीच गाजवली आहे. पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसणार आहे, हा एक फॅमिली ड्रामा सिनेमा असणार आहे.

ठळक मुद्देऋषी कपूर आणि जुही चावला पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे

ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्या जोडीने सिल्वर स्क्रीन चांगलीच गाजवली आहे. पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसणार आहे, हा एक फॅमिली ड्रामा सिनेमा असणार आहे. हितेश भाटिया याचे दिग्दर्शन करणार आहे. सिनेमाचे नाव अजून निश्चित करण्यात आलेले नाही मात्र शूटिंग सुरु झाली आहे. या जोडीला पुन्हा एकदा एकत्र बघण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही.

सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडिया या सिनेमाची निर्मिती करणार आहे. ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्या जोडीने 'साजन का घर', 'ईना मीना डीका' आणि 'बोल राधा बोल'सारखे अनेक हिट सिनेमा दिले आहे. नुकतेच ऋषी कपूर 'मुल्क'मध्ये दिसले होते ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.  मुल्क हा क्राईम आणि पॉलिटिकल थ्रीलर सिनेमा आहे. कोर्टरूममधील दमदार युक्तिवाद, एकापेक्षा एक दमदार संवाद आणि एका अगतिक कुटुंबाची न्याय मिळवण्यासाठीची धडपड हे सगळे हृदयाचा ठाव घेणारे होता.

 काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर रणबीर आणि आलियाच्या नात्याबाबत बोलले होते. मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले, रणबीरला स्वत:चे आयुष्य आहे. त्याला त्याचा जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याला आवडणाऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य असून नीतूला आलिया आवडते, मलासुध्दा आवडते. आमच्या घरातसुद्धा प्रत्येकाने मनपसंत जोडीदार निवडला आहे. त्यामुळे रणबीरलासुद्धा तो हक्क आहे.   

टॅग्स :ऋषी कपूरजुही चावला