}}}} ">Sunny Deol and Dimple Kapadia are enjoying their holidays together. They are looking beautiful couple. pic.twitter.com/XB6yI4t07v— KRK (@kamaalrkhan) September 27, 2017
डिम्पल कपाडियासोबतच्या फोटोवरून पुन्हा एकदा केआरकेने सनी देओलशी घेतला पंगा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 20:12 IST
आज सकाळी जेव्हा डिम्पल कपाडिया आणि सनी देओलचा फोटो आणि व्हिडीओ समोर आला तेव्हापासून सोशल मीडियावर या दोघांच्या प्रेमाची ...
डिम्पल कपाडियासोबतच्या फोटोवरून पुन्हा एकदा केआरकेने सनी देओलशी घेतला पंगा!
आज सकाळी जेव्हा डिम्पल कपाडिया आणि सनी देओलचा फोटो आणि व्हिडीओ समोर आला तेव्हापासून सोशल मीडियावर या दोघांच्या प्रेमाची कथा नव्याने रंगविली जात आहे. अशात केआरके ऊर्फ कमाल खान मागे कसा राहणार. त्यानेही सनी आणि डिम्पल एकत्र दिसत असलेला व्हिडीओ शेअर करीत सनीपाजीला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याने नेहमीच्याच अस्त्राचा वापर करीत सनी देओलवर वॉर केला. होय, केआरकेने ट्विटर या अस्त्राचा वापर करताना, सनी देओल आणि डिम्पल कपाडियाच्या या व्हिडीओवर कॉमेण्ट केले. वास्तविक सनी देओलला त्याच्या डॅशिंग अंदाजासाठी इंडस्ट्रीत ओळखले जाते. त्यामुळे त्याच्याशी कोणीही पंगा घेताना बºयाचदा विचार करतो. अशात केआरके मात्र सनीपाजीशी पंगा घेण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या सनीपाजीचे ‘पोस्टर बॉयज’ या चित्रपटावर केआरकेने सडकून टीका केली होती. यावेळी त्याने सनी देओलचे स्टारडम राहिले नसल्याचे म्हटले होते. मात्र त्यावेळी सनी देओलने केआरकेला काहीही उत्तर दिले नव्हते. आता त्याने पुन्हा एकदा सनी देओलवर वॉर केला आहे. केआरकेने सनी देओल आणि डिम्पल कपाडियाचा ट्विटरवर व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, ‘सनी देओल आणि डिम्पल कपाडिया एकत्रित हॉलिडे एन्जॉय करीत आहेत. ते खूपच सुंदर कपलप्रमाणे दिसत आहेत.’ केआरकेचे हे ट्विट जरी सौम्य वाटत असले तरी त्याने सनी देओलला यातून टोमणा मारला आहे. आता केआरकेच्या या ट्विटला सनी देओल कशा पद्धतीने उत्तर देणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, सनी आणि डिम्पल कपाडियाने पाच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. यादरम्यान त्यांच्यात जवळीकता वाढली होती. त्याकाळी दोघांची लव्हस्टोरी चांगलीच रंगली होती. परंतु काही कारणास्तव हे दोघे एकत्र येऊ शकले नाही. परंतु त्यांच्यातील नाते संपले असे म्हणणे चुकीचे ठरेल, असेच त्यांच्या या फोटोवरून म्हणावे लागेल.