पुन्हा एकदा ‘हिरोपंती’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 19:22 IST
‘हिरोपंती’ या चित्रपटाद्वारे टायगर व क्रिती या दोघांनी बॉलिवूड डेब्यू केले. सध्या टायगर व क्रिती हे दोघेही ‘तनु वेड्स मनू’फेम दिग्दर्शक आनंद एल राय यांच्यासोबत बनारसमध्ये शूटींग करत आहेत.
पुन्हा एकदा ‘हिरोपंती’!!
सन २०१४ हे वर्ष टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनन यांच्यासाठी मोठी संधी घेऊन आले होते. याच वर्षी आलेल्या ‘हिरोपंती’ या चित्रपटाद्वारे टायगर व क्रिती या दोघांनी बॉलिवूड डेब्यू केले. यानंतर टायगर वा क्रिती या दोघांपैकी कुणीही मागे वळून पाहिले नाही. ‘हिरोपंती’नंतर क्रिती शाहरूख खान, काजोल आणि वरूण धवनसोबत ‘दिलवाले’मध्ये दिसली. टायगरलाही ‘बागी’ आणि ‘अ फ्लार्इंग जट्ट’ या दोन मोठ्या सिनेमांची लॉटरी लागली. अर्थात टायगर व क्रिती ही जोडी यादरम्यान कुठेही दिसली नाही. पण सध्या टायगर व क्रिती हे दोघेही ‘तनु वेड्स मनू’फेम दिग्दर्शक आनंद एल राय यांच्यासोबत बनारसमध्ये शूटींग करत आहेत. क्रितीने आनंद एल राय यांच्यासोबतची तिची व टायगरची एक सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘शूटींग विद टायगर अॅण्ड आनंद सर इन बनारस!! सरप्राईज, सरप्राईज’, असे कॅप्शन तिने यास दिले आहे. आता हे सरप्राईज कुठले, हे तर आम्हाला ठाऊक नाही. हे सिनेमाचे शूटींगआहे की आणखी काही हेही ठाऊक नाही...तेव्हा बघू, या सरप्राईजवरून कधी पडदा उठतो ते!