Join us

माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त पती डॉ. श्रीराम नेनेंची खास पोस्ट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 16:23 IST

Madhuri Dixit : आज माधुरीचा वाढदिवस असून यानिमित्ताने तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या सतत चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वीच माधुरी तिच्या कुटुंबासह अमेरिकेतून पुन्हा भारतात स्थायिक झाली आहे. भारतात आल्यानंतर तिने सिनेइंडस्ट्रीतही कमबॅक केले आहे. आज माधुरीचा वाढदिवस असून यानिमित्ताने तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासोबतचे फोटो शेअर करत डॉ. नेनेंनी लिहिले की, “मनमोहक हास्य, चेहऱ्यावर कायम तेज आणि नृत्याची खूप आवड असणाऱ्या माझ्या आयुष्यातील या महत्त्वाच्या स्त्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझं आमचं सगळ्यांच्या जीवनात असणं हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. खरंच आम्ही सगळे (कुटुंबीय) तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. 

माधुरीच्या नवऱ्याने या पोस्टमध्ये फोटोंचा कोलाज असलेला व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी दोघांचे रोमँटिक फोटो, माधुरीचे काही जुने फोटो, तिचे मुलांबरोबरचे आणि सासू-सासऱ्यांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. या व्हिडीओसोबत ‘आजा नचले’ चित्रपटातील “इश्क़ हुआ ही हुआ” हे गाणे वापरले आहे.

१७ ऑक्टोबर १९९९ साली माधुरी दीक्षितने डॉ. नेनेंसोबत लग्नगाठ बांधली. यानंतर ती देखील अमेरिकेतच स्थायिक झाली.  काही वर्षांपूर्वीच दोघंही भारतात परतले आहेत. दोघांनी आता निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं असून त्यांचा एक सिनेमाही रिलीजही झाला आहे. 

टॅग्स :माधुरी दिक्षित