Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG !! ​वरूण धवनसोबत काय करतोय सुनील ग्रोव्हर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 13:36 IST

सुनील ग्रोव्हरचे चाहते त्याला छोट्या पडद्यावर पाहण्यास उत्सूक आहेत. अशातच एका फोटोने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवलीय. होय, काल वरूण ...

सुनील ग्रोव्हरचे चाहते त्याला छोट्या पडद्यावर पाहण्यास उत्सूक आहेत. अशातच एका फोटोने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवलीय. होय, काल वरूण धवनने सुनील ग्रोव्हरसोबतचा एक सेल्फी शेअर केला. आता या सेल्फीमागच्या रहस्याने अनेकांची उत्सुकता वाढली आहे.  शेवटी सुनील वरूणसोबत करतोय तरी काय? हेच सगळ्यांना जाणून घ्यायचे आहेत. वरूणसोबत सुनीलने कुठला सीक्रेट प्रोजेक्ट साईन केला की, सुनीलच्या मस्ट अवेटेड कमबॅकशोमध्ये वरूण पहिला पाहुणा बनून येणार? असे सगळे प्रश्न आहेत. आता या प्रश्नात तुम्ही गुरफटून जायला नको, म्हणून आम्हीच काय ते स्पष्ट करतोय.होय, वरूण व सुनीलचा हा सेल्फी कुठल्याही प्रोजेक्टचा संकेत नाही तर नुसता योगायोग आहे. होय, नुसता योगायोग! त्याचे झाले असे की, सुनील व वरूण दोघेही मुंबईवरून दिल्लीला निघाले होते. योगायोगाने दोघेही एकाच फ्लाईटमध्ये बसले. मग काय, भेट झाली तर एक सेल्फी तर बनतोच ना?तूर्तास सुनील आपला कमबॅक शो घेऊन येणार अशी चर्चा आहे. ‘द ड्रामा कंपनी’ सुनील ग्रोव्हरचा एक नवा कार्यक्रम घेणार असे सध्या ऐकायला आहे.  चर्चा खरी मानाल तर,सध्या सुनील ग्रोव्हर आणि सोनी वाहिनीच्या टीममध्ये या कार्यक्रमावरून चर्चा सुरू आहे. कार्यक्रमाची संकल्पना काय असणार याबाबत ही चर्चा आहे. हा कार्यक्रम देखील एक कॉमिक कार्यक्रम असणार आहे. ALSO READ : ​OMG!! कपिल शर्माचा शो सोडून गेल्याने दादी, चंदू आणि डॉक्टर गुलाटीचे झाले लाखोंचे नुकसान !सुनील ग्रोव्हर द कपिल शर्मा शोमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत होता. त्याने साकरलेली डॉ. गुलाटी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. पण सुनील आणि कपिलच्या झालेल्या भांडणानंतर त्याने या कार्यक्रमाला रामराम ठोकला. त्यानंतर सोनी वाहिनीच्या काही कार्यक्रमामध्ये सुनीलने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. पण सुनील मुख्य भूमिकेत असलेला एखादा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली आहे. या नव्या कार्यक्रमामुळे सुनीलच्या फॅन्सची इच्छा पूर्ण होणार आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.