OMG!! टी-शर्ट वर करून काय दाखवतेयं सुश्मिता सेन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 13:51 IST
येत्या १९ नोव्हेंबरला सुश्मिता सेन ४२ वर्षांची होणार आहे. पण अजूनही सुश्मिताची क्रेझ कमी झालेली नाही. तिचा हा ताजा फोटो पाहिल्यानंतर आम्ही जे लिहिलेयं, ते तुम्हालाही पटेल.
OMG!! टी-शर्ट वर करून काय दाखवतेयं सुश्मिता सेन?
येत्या १९ नोव्हेंबरला सुश्मिता सेन ४२ वर्षांची होणार आहे. पण अजूनही सुश्मिताची क्रेझ कमी झालेली नाही. तिचा हा ताजा फोटो पाहिल्यानंतर आम्ही जे लिहिलेयं, ते तुम्हालाही पटेल.दीर्घकाळापासून सुश्मिता चित्रपटात दिसलेली नाही. २०१० मध्ये ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. तेव्हापासून ती मोठ्या पडद्यावरून गायब आहे. अर्थात सोशल मीडियावर ती तेवढीच अॅक्टिव्ह आहे. सुश्मिताने सोशल मीडियावर आपला एक ताजा फोटो पोस्ट केला आहे. यात सुश्मिताने तिचे टी-शर्ट दातांत दाबून धरलेय. या फोटोचा अर्थ स्पष्ट आहे, टी-शर्ट वर करून सुश्मिताला काहीतरी दाखवायचे आहे. काय तर तिच्या सिक्स पॅक अब्स. होय, हा फोटो शेअर करताना सुश्मिताने एक कॅप्शनही लिहिलेय. ‘शेपमध्ये परत येण्यासाठी ट्रेनिंग घेतेय. आपल्या ४२ व्या वाढदिवशी मला हव्या असलेल्या शेपमध्ये परतायचे आहे. मेरी बॉडी, मेरे रूल्स,’ असे तिने लिहिलेय. या फोटोंवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे आपल्या वाढदिवशी सुश्मिता काहीतरी खास करणार आहे. आता हे खास काय, हे मात्र आम्हाला ठाऊक नाही. अर्थातच त्यासाठी आपल्याला १९ नोव्हेंबरची प्रतीक्षा करावी लागेल. सुश्मिताला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सूक आहे. पण तूर्तास तरी तिने कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. असे असताना सुश्मिताने कसली तयारी चालवलीय, हे कळायला मार्ग नाही. ALSO READ: सुश्मिता सेनची लेक रेनी झाली १८ वर्षांची! पाहा, Inside Photo!!खरे तर सुश्मिताने आपल्याबद्दल कधीही काहीही लपवले नाही. इंडस्ट्रीत नवखी असताना सुश्मिता व विक्रम भट्ट या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. सुश्मितासाठी विक्रमने आपल्या पत्नी व मुलीलाही सोडले होते. पण इतके करूनही सुश्मिता विक्रमच्या आयुष्यात टिकली नाही. पुढे विक्रमने या रिलेशनशिपबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. विक्रमनंतर सुश्मिताच्या आयुष्यात रणदीप हुड्डाची एन्ट्री झाली. सुश्मिताची दत्तक मुलगी रेनी हिलाही रणदीप आवडायचा. पण काही वर्षांत या रिलेशनशिपचाही शेवट झाला. रणदीपनंतर अगदी अलीकडे सुश्मिता मनिष मल्होत्राच्या पार्टीत एका तिच्यापेक्षा कमी वयाच्या तरूणासोबत दिसली होती. सुश्मिता या तरूणाच्या खूप क्लोज आहे, अशी चर्चा आहे.