OMG! आलिया भट्टकडे नाही डॅड महेश भट्ट यांच्या चित्रपटासाठी वेळ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 10:22 IST
आपले सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत बॉलिवूडवर राज करू लागलेली अभिनेत्री आलिया भट्ट हिच्याकडे सध्या अजिबात वेळ नाहीय. एकापाठोपाठ ...
OMG! आलिया भट्टकडे नाही डॅड महेश भट्ट यांच्या चित्रपटासाठी वेळ!!
आपले सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत बॉलिवूडवर राज करू लागलेली अभिनेत्री आलिया भट्ट हिच्याकडे सध्या अजिबात वेळ नाहीय. एकापाठोपाठ एक असे चित्रपट तयार असल्याने आलियाला अगदी श्वास घेण्याचीही उसंत नाहीये. अलीकडे आलियाने ‘राजी’ हा सिनेमा हातावेगळा केला आणि यानंतर लगेच ती ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटसाठी विदेशात रवाना झालीय. हा चित्रपट संपतो ना संपतो तोच रणवीर सिंगसोबतचा ‘गल्ली बॉय’ हा चित्रपट आलियाला करायचायं. एकंदर काय तर आलियाकडे खरचं वेळ नाहीय. स्थिती तर ही आहे की, यामुळे तिचे डॅड महेश भट्ट यांचाही खोळंबा होतोय. होय, आम्ही सांगतोयं ते अगदी खरे आहे. आलियाच्या बिझी शेड्यूलमुळे महेश भट्ट यांचा एक चित्रपट खोळंबला आहे. हा चित्रपट कुठला तर ‘सडक२’. ‘सडक’च्या रिमेकमध्ये आलिया दिसणार आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने ती पहिल्यांदा वडिलांसोबत काम करणार आहे. या नव्या वर्षात या चित्रपटावर काम सुरु होणे अपेक्षित होते. पण आलियामुळे सगळेच काम आहे तिथेच थांबले आहे. कारण आलियाकडे या चित्रपटासाठी सध्या तरी डेट्स नाहीत. त्यामुळे आलिया मोकळी झाल्यानंतरचं या चित्रपटाचे काम सुुरू होऊ शकणार आहे. ‘सडक’चा हा सीक्वल यावेळी पूजा भट्ट दिग्दर्शित करणार आहे. संजय दत्त या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत असेल.ALSO READ : OMG !! करण जोहरने लाख मनधरणी करूनही आलिया भट्टने दिला प्रभासची हिरोईन बनण्यास नकार!!१९९१ मध्ये ‘सडक’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यातील चार्टबस्टर म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. यात पूजा भट्ट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात संजय दत्त एका वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि यानंतर दलालांपासून तिला वाचवतो, असे दाखवले गेले होते. हीच कथा पुढे नेत ‘सडक’च्या रिमेकमध्ये संजय दत्त व त्याच्या मुलीची कथा दाखवली जाणार आहे. यात पूजा भट्ट ही सुद्धा फ्लॅशबॅकमध्ये दिसणार आहे.