Join us

OMG! ​सलमान खानबद्दल हे काय बोलून गेली सोनाक्षी सिन्हा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 10:51 IST

सलमान खान व सोनाक्षी सिन्हा या दोघांची बॉन्डिंग वेगळीच आहे. कदाचित म्हणूनच दोघेही परस्परांसोबत बरेच कम्फर्टेबल असतात. सलमानने आजपर्यंत ...

सलमान खान व सोनाक्षी सिन्हा या दोघांची बॉन्डिंग वेगळीच आहे. कदाचित म्हणूनच दोघेही परस्परांसोबत बरेच कम्फर्टेबल असतात. सलमानने आजपर्यंत केवळ सोनाक्षीसोबत डबस्मॅश बनवले, त्याचे कारणही कदाचित हेच होते. पण अलीकडे नेहा धूपियाच्या ‘नो फिल्टर नेहा 2’ या चॅट शोमध्ये मात्र सोनाक्षी काहीशी बदललेली दिसली. होय, सलमानबद्दल ती काही वेगळेच बोलून गेली.सलमानसाठी लोक वेडे असतील, मी नाही. त्याची जादू अनेकांवर चालत असेल, माझ्यावर नाही, असे सोनाक्षी बेधडकपणे बोलून गेली. शेवटी इतकी ‘दबंगई’ केवळ सोनाक्षीलाच चांगली दिसते.  नेहाच्या शोमध्ये सोनाक्षी आणखीही बरेच काही बोलली. नेहाने सोनाक्षीला तिच्या मनातील एक तीव्र इच्छा कुठली, असे विचारले यावर कुणाला तरी जीवानिशी मारावे, अशी माझी इच्छा असल्याचे सोनाक्षीने हसत हसत सांगितले. अर्थात कुणाला, हे सांगणे मात्र तिने टाळले. याच शोमध्ये सोनाक्षीने स्वत:ला ‘सेल्फी क्वीन’ हा किताबही देऊन टाकला. माझ्याकडे आधीपासूनच डिजिटल कॅमेरा होता. या कॅमेºयाने मी नुसते घरभर फिरत स्वत:चे फोटो क्लिक करत बसायचे. यालाच भविष्यात सेल्फी असे नाव मिळणार आहे, हे मला तेव्हा ठाऊक नव्हते. त्यामुळे मी सेल्फी क्वीन आहे,असे ती म्हणाली. बॉलिवूडचा हॅण्डसम अभिनेता जॉन अब्राहम याला मला माझा बॉडीगार्ड म्हणून बघायचे आहे, असेही गमती-गमतीत सोनाक्षीने सांगितले. जॉनपेक्षा दुसरा चांगला बॉडीगार्ड दुसरा असूच शकत नाही, असेही ती म्हणाली. तुम्हाला माहित असेलच की, ‘फोर्स2’मध्ये सोनाक्षी व जॉन सोबत दिसले होते आणि या चित्रपटात जॉन अनेकदा सोनाक्षीचा जीव वाचवताना दिसला होता.ALSO READ : सोनाक्षी सिन्हाबद्दल जाणून घ्या, काही माहित नसलेल्या गोष्टी!