Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ‘देवदास’च्या शूटिंगवेळी शाहरूख खान रोजच सेटवर करायचा मद्यपान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 22:05 IST

‘देवदास’ या चित्रपटातील किंग शाहरूख खानची भूमिका तुम्हाला आठवत असेलच. चित्रपटात शाहरूखने एका मद्यपी प्रेमवीराची भूमिका साकारली होती. पारोचे ...

‘देवदास’ या चित्रपटातील किंग शाहरूख खानची भूमिका तुम्हाला आठवत असेलच. चित्रपटात शाहरूखने एका मद्यपी प्रेमवीराची भूमिका साकारली होती. पारोचे प्रेम मिळविण्यासाठी तो असा काही नशेच्या आहारी जातो ज्यामधून त्याला बाहेर पडणे मुश्किल होते. शाहरूखने ही भूमिका अतिशय दमदार अन् तेवढ्याच सशक्तपणे साकारली होती. प्रेक्षकांना तर आजही शाहरूखचा तो हातात बाटली घेऊन झुलणारा लुक आठवतो. मात्र त्याला या भूमिकेत शिरण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. वास्तविक जीवनात त्याला दारूच्या आहारी जावे लागले. यामुळे सेटवरील इतर मंडळी त्याला त्रस्त झाली होती. जेव्हा शाहरूख सेटवर पोहचत असे, तेव्हा तो पहिली मागणी दारूसाठी करीत असे. शाहरूखची ही मागणी नित्याचीच झाल्याने, सेटवरील इतर मंडळी त्रस्त झाली होती. दिग्दर्शकांसाठी तर शाहरूख डोकेदुखी ठरत होता. चित्रपटात बरेसचे असे सीन्स आहेत, ज्यामध्ये शाहरूखला दारूच्या नशेत स्वत:ला दाखवायचे होते. शाहरूखला हे सीन्स रिअल दाखवायचे होते, म्हणून तो नियमितपणे सेटवर दारू पित होता. वास्तविक त्याने नशेतच हे सीन्स करावेत असे दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांनी त्याच्यावर अजिबात दबाव टाकला नव्हता. मात्र शाहरूखने या भूमिकेसाठी स्वत:ला नशेच्या आहारी नेले होते. शाहरूखची ही मेहनत बघून भंसाली खूपच इम्प्रेस झाले होते. वास्तविक जीवनात शाहरूखने एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच मद्यपान केले नव्हते. याचा खुलासा खुद्द शाहरूखनेच एका मुलाखतीदरम्यान केला होता. मात्र भूमिका जीवंत करण्यासाठी त्याने नशेचा आधार घेतला होता. त्यात तो यशस्वी झाला होता. ‘देवदास’ ही भूमिका शाहरूखच्या करिअरमधील आतापर्यंतची सर्वांत चांगली भूमिका समजली जाते. या चित्रपटामुळे शाहरूखला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.