मध्यंतरी त्यांचा वाद गरम असताना दोघांना एकत्र पाहणेसुद्धा अवघड होते. मात्र काळासंगे त्यांचे मतभेद थोडेसे कमी झाले. शाहरुख ‘३ इडियट्स’च्या सक्सेस पार्टीतही सामील झाला होता तेव्हापासून हे दोन खान कार्यक्रमांमध्ये अधूनमधून एकत्र दिसत असतात.►ALSO READ: आमिर खानच्या दाढी लूकवर कोण आहे फिदा?या फोटोमध्ये जर सलमान खान असता तर कमालच झाली असती. तीन खानांचा सोबत सेल्फी ही राष्ट्रीय बातमी ठरली असती. त्यामुळे तिघांनी वेळ काढून चाहत्यांची ही इच्छाही पूर्ण करायला हवी. शाहरुख सध्या इम्तियाज अली दिग्दर्शित ‘रहनुमा’ चित्रपटाची शूटींग करीत असून त्यानंतर तो आनंद एल रायच्या सिनेमावर काम सुरू करणार आहे. ‘दंगल’च्या तुफान यशानंतर आमिर ‘ठग्स आॅफ हिंदूस्थान’ या चित्रपटाची तयारी करीत आहे. यामध्ये तो प्रथमच अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सिनेमातील भूमिकेसाठी त्याने दाढीसुद्धा वाढवलेली आहे.Known each other for 25 years and this is the first picture we have taken together of ourselves. Was a fun night. pic.twitter.com/7aYKOFll1a— Shah Rukh Khan (@iamsrk) 10 February 2017
OMG! शाहरुख खान -आमिर खानचा २५ वर्षांतील पहिलाच सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 11:04 IST
शाहरुख खान आणि आमिर खान या दोघांचे एकत्र अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. मात्र तुम्ही कधी या दोन खानांचा ...
OMG! शाहरुख खान -आमिर खानचा २५ वर्षांतील पहिलाच सेल्फी!
शाहरुख खान आणि आमिर खान या दोघांचे एकत्र अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. मात्र तुम्ही कधी या दोन खानांचा सेल्फी पाहिला आहे का? नाही ना! अहो सगळे स्टार सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर करीत असताना बॉलीवूडमधील या दोन बड्या स्टार्सचा एवढ्या वर्षांत एकही एकत्रितपणे काढलेला सेल्फी नाही. पण काल रात्री तो ‘बहुप्रतीक्षित’ सेल्फी बाहेर आला.व्यवसायिक अजय बिजली यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र आलेल्या आमिर-शाहरुखने २५ वर्षांत प्रथमच सेल्फी काढला. शाहरुखने क्लिक केलेला हा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केला. सोबत कॅप्शन दिले की, ‘२५ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. पण आम्हीच काढलेला दोघांचा एकत्र हा पहिलाच फोटो आहे. ही रात्र यादगारी ठरली.’►ALSO READ: ‘गोलमाल ४’ मध्ये दिसणार अजय देवगन-शाहरुख खानची जोडीकधीच एकत्र फोटो न काढल्याची आठवण शाहरुखने अत्यंत भावूक शब्दांत व्यक्त केली. म्हणजे दोन मित्र आणि एवढ्या वर्षांत एकही फोटो नाही म्हटल्यावर आश्चर्य वाटणे स्वभाविक आहे. तसे त्यांचे एकत्र अनेक फोटोज आहेत; मात्र त्यांनी स्वत: काढलेला हा पहिलाच फोटो असल्यामुळे हा सेल्फी आयकॉनिक ठरणार यात काही वाद नाही.