OMG ! हृतिक रोशनच्या आईचे ‘हे’ व्हिडिओ पाहून तुम्हीही पडाल चाट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 14:12 IST
फिटनेसच्या बाबतीत हृतिक रोशन बड्या बड्यांना टक्कर देतो. पण अलीकडे हृतिक रोशनची नजर एका ६३ वर्षांच्या महिलेवर पडली आणि तो चाट पडला.
OMG ! हृतिक रोशनच्या आईचे ‘हे’ व्हिडिओ पाहून तुम्हीही पडाल चाट!!
फिटनेसच्या बाबतीत हृतिक रोशन बड्या बड्यांना टक्कर देतो. पण अलीकडे हृतिक रोशनची नजर एका ६३ वर्षांच्या महिलेवर पडली आणि तो चाट पडला. होय, ही ६३ वर्षांची महिला वेटलिफ्टिंग करत होती. या महिलेच्या वर्कआऊटचे अनेक व्हिडिओ हृतिकने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. ‘मी याला प्रेरणा म्हणू की प्रतिस्पर्धी मानूू, मला ठाऊक नाही,’असे हे व्हिडिओ पोस्ट करताना हृतिकने लिहिलेयं. ही महिला दुसरी कुणी नसून हृतिकची आई पिंकी रोशन आहे. होय, हृतिकची आई फिटनेसच्या बाबतीत मुलापेक्षा जराही कमी नाही. वेट लिफ्टिंगपासून किक बॉक्सिंगपर्यंत आणि लंजेसपासून तर योगापर्यंत असे सगळे काही त्या करतात. त्यांचे वर्क आऊटचे व्हिडिओ पाहून अनेक बॉलिवूड स्टार्सनी सुद्धा तोंडात बोटं घातली आहेत. टायगर श्रॉफ, वानी कपूर आणि यामी गौतम यांनीही या व्हिडिओंवर कमेंट करत पिंकी रोशन यांची जोरदार प्रशंसा केली आहे. तुम्हीही हे व्हिडिओ बघा आणि तुमची मतं आम्हाला कळवा. ALSO READ : हृतिक रोशन व सुजैन खान आपल्या नात्याला देणार दुसरी संधी? पुन्हा करणार लग्न?तूर्तास हृतिकबद्दल सांगायचे तर तो ‘सुपर30’ चित्रपटात बिझी आहे. काही दिवसांपूर्वी हृतिकचे पापड विकतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ‘सुपर30’ हा चित्रपट पाटणाच्या आनंद कुमार याच्या जीवनावर आधारित आहे. आनंद कुमार बिहारात ‘सुपर ३०’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. पुढच्या वर्षी 25 जानेवरीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.