Join us

OMG : सलमान खानला अजिबातच आवडली नाही ‘दबंग-३’ची स्क्रिप्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 20:15 IST

भाईजान सलमान खानचा ‘दबंग’ सीरिजचा तिसरा पार्ट येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र कधी येणार? शूटिंगला केव्हा सुरू ...

भाईजान सलमान खानचा ‘दबंग’ सीरिजचा तिसरा पार्ट येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र कधी येणार? शूटिंगला केव्हा सुरू केली जाणार? सलमान व्यतिरिक्त इतर स्टारकास्ट कोण असेल? या प्रश्नांची कोणाकडेच उत्तरे नाहीत. मात्र आम्ही तुम्हाला जी माहिती सांगणार आहोत, ती वाचून तुमच्या मनातील प्रश्नांचे समाधान होईल हे निश्चित. वास्तविक ‘दबंग-३’च्या शूटिंगला विलंब होण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटाची कथा सलमानला अजिबातच आवडलेली नाही. त्यामुळेच चित्रपटाच्या पुढच्या शेड्यूल्डला विलंब होत आहे. सलमानचा ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. सलमानच्या या चित्रपटाने फारशी कमाल केली नसल्याने वितरकांना चांगलाच तोटा सहन करावा लागत आहे. वास्तविक सलमानच्या चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, त्याने त्याचे स्टारडम कायम ठेवण्यासाठी ‘वॉण्टेड किंवा दबंग’सारखे चित्रपट करायला हवे. शिवाय अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असताना त्याच्या ‘दबंग ३’ या चित्रपटाचीही प्रेक्षकांना आतुरता लागल्याचे दिसून येत आहे. वास्तविक ‘दबंग’ सीरिजमुळे सलमानला ‘दबंग खान’ अशी ओळख निर्माण करून दिली आहे. त्यामुळे या सीरिजच्या चित्रपटात त्याचा असाच काहीसा ‘दबंग’ अवतार चाहत्यांना बघावयास मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशात सलमानला ‘दबंग-३’ची स्क्रिप्टिंग कमकुवत वाटत असल्याने त्याने प्रोजेक्टवर काम करणे थांबविले आहे. काही दिवसांपूर्वीच अरबाज खानने सलमानला स्क्रिप्ट वाचून दाखविली होती. मात्र सलमानला ती अजिबातच आवडली नसल्याने, त्याने अरबाजला स्क्रिप्टवर आणखी काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर जोपर्यंत स्क्रिप्ट दमदार होणार नाही, तोपर्यंत मी कामास सुरुवात करणार नसल्याचेही त्याने स्पष्ट शब्दात सांगितले आहे. खरं तर सलमानला एवढं चूजी होण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘ट्यूबलाइट’चे फ्लॉप होणे होय. सध्या सलमान ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, यामध्ये त्याचा धमाकेदार अंदाज बघावयास मिळण्याची शक्यता आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ हीदेखील डॅशिंग अंदाजात बघावयास मिळणार आहे.