OMG : रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचे झाले ब्रेकअॅप ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 13:47 IST
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूडमध्ये सगळ्यात क्यूट कपलपैकी एक आहे. या दोघांना एकत्र पाहणे त्यांच्या फॅन्सना खूप ...
OMG : रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचे झाले ब्रेकअॅप ?
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूडमध्ये सगळ्यात क्यूट कपलपैकी एक आहे. या दोघांना एकत्र पाहणे त्यांच्या फॅन्सना खूप आवडते. हे दोघे ज्या चित्रपटात एकत्र असतात तो चित्रपट हिट जातोच. आता जी बातमी आम्हीला तुम्हाला सांगणार आहोत ती दीपिका आणि रणवीरच्या फॅन्ससाठी फारशी चांगली नाही आहे. रणवीरने दीपिका आणि त्याच्या नात्याला घेऊन एक खूप मोठा निर्णय घेतल्याचे समजते. रणवीर सिंग आणि दीपिकाचे नाते संपुष्टात आल्याचे समजते आहे. बॉलिवूडच्या बाजीराव आणि मस्तानीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याला कारण दोघांमधला कोणताही वाद, तणाव नाही. तर फक्त कामाच्या दबावामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. ऐवढेच नाही तर रणवीरने त्याची नवी गर्लफ्रेंडसुद्धा शोधली आहे. ALSO READ : secret affair!! दीपिका पादुकोण टेनिस स्टार नोवाक जोकोविचच्या प्रेमात? दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबीयांची इच्छा आहे की दोघांनी नात्याला एक पाऊल पुढे घेऊऩ जात लग्न बंधनात अडकावे. रणवीरला ही दीपिकासोबत संसार थाट्याची इच्छा आहे. मात्र या सगळ्यासाठी दीपिका तयार नाहीय. तिला सध्या तिच्या करिअरवर लक्षकेंद्रीत करायचे आहे. दीपिकाच्या या निर्णयमुळे रणवीरने आयुष्यात पुढे जायचा निर्णय घेतला आहे. गेल्या 5 वर्षांपासून दीपिका आणि रणवीर नात्यात होते. दोघांनी साखरपुडा केल्याची ही चर्चा होती. काही दिवसांपूर्वीच रणवीरच्या बर्थ डे ला मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर दोघे हातात हात घालून आले होते. मग असं काय झालं की दोघांचं नातं तुटलं? दीपिका आणि रणवीरमध्ये कोणतीही कटूता नसल्याचं सांगितलं जात आहे. फक्त एकमेकांना वेळ न देता येत नाही आहे म्हणून दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह दूर झाले. लवकरच दोघे संजय लीला भंसालींच्या 'पद्मावतीम'ध्ये एकत्र दिसणार आहेत.