Join us

OMG! सीक्रेट वेडिंगनंतर समोर आली राखी सावंतची मुलगी, राखीनं तिच्यासाठी मागितला आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 14:24 IST

आता सीक्रेट वेडिंगनंतर आता राखीच्या मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे

ड्रामा क्वीन राखी सावंत सोशल मीडियावर सक्रीय आहे. इंस्टाग्रामवरील फोटो व व्हिडिओमुळे ती नेहमी चर्चेत असते. त्यात आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे आता सीक्रेट वेडिंगनंतर आता तिच्या मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे. तिनेच इंस्टाग्रामवर आपल्या मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

खरंतर १३ नोव्हेंबरला राखी सावंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. राखीने व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, मित्रांनो आणि माझे चाहते ही माझी मुलगी आहे.प्लीज तिला आशीर्वाद द्या. राखीच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावरील युजर्स खूप रिएक्ट करत आहेत.

सोशल मीडियावरील युजर्सने राखी सावंतच्या मुलीच्या व्हिडिओ पाहून प्रशंसा करत आहेत तर काही युजर्स ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिलं की, ही जगातील सर्वात क्यूट मुलगी आहे.  तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, ही बाई वेडी झाली आहे. तर काही जण म्हणत आहेत की ही राखीची मुलगी नाही तर स्वतः राखी आहे.

राखीने या व्हिडिओसाठी बेबी फिल्टर वापरलं आहे त्यामुळे लहान मुलीसारखी दिसते आहे. या व्हिडिओत राखी म्हणाली की, हे फ्रेंड्स तुम्ही मला ओळखलंत , मी राखी सावंतची मुलगी आहे. तुम्ही माझी आई राखीला खूप पसंत करतात. त्यामुळेच आज मी माझी आईच्या फोनवर व्हिडिओ बनविला आहे.

राखी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वी राखी तिच्या सीक्रेट वेडिंगमुळे चर्चेत आली होती. अद्याप तिच्या नवऱ्याचा समोर आला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर राखीच्या फोटो व व्हिडिओवर युजर्स राखीचं लग्न फेक असल्याची कमेंट करत असतात.

टॅग्स :राखी सावंत