Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! प्रियांका चोप्रा व निक जोनास होणार एन्गेज्ड!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 19:14 IST

 प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये रमली आणि मग हॉलिवूडच्याच एका व्यक्तीवर भाळली. होय, प्रियांका व अमेरिकन सिंगर निक जोनास यांच्या प्रेमाच्या ...

 प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये रमली आणि मग हॉलिवूडच्याच एका व्यक्तीवर भाळली. होय, प्रियांका व अमेरिकन सिंगर निक जोनास यांच्या प्रेमाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. सध्या निक प्रियांकाच्या आईला भेटण्यासाठी खास भारतात आला आहे. भारतात पाऊल ठेवताचं प्रियांकाने मोठ्या शिताफीने निकला मीडियाच्या नजरेपासून वाचवले. यानंतर दोघेही डिनर डेटवर गेलेत. यावेळी प्रियांकाची आई मधु चोप्रा सुद्धा त्यांच्यासोबत होती. यानंतर प्रियांका व निक गोव्यात हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी रवाना झालेत. तेव्हापासून सतत या कथित कपलकडे  मीडियाचे लक्ष आहे. आता या कथित कपलबद्दल एक वेगळीच बातमी कानावर येत आहे. होय, प्रियांका व निक दोघेही येत्या जुलै वा आॅगस्टमध्ये साखरपुडा करू शकतात, असे कळतेय. भारतातचं हा साखरपुडा होईल, असेही समजतेय. आता या बातमीत किती तथ्य आहे, किती नाही हे लवकरचं कळेल. तोपर्यंत प्रियांका व निकच्या फुलत्या प्रेमाकडे आमचे लक्ष असेलच.गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड अभिनेता निक जोनस याच्याशी तिचे नाव जोडले जात आहे, तर प्रियांकाकडून अद्यापपर्यंत तिच्या या रिलेशनबद्दल कुठल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य समोर आले नाही.गेल्या आठवड्यात प्रियांकाला निकच्या कजिनच्या लग्नातही बघण्यात आले होते. याठिकाणीदेखील दोघांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची केमिस्ट्री बघावयास मिळाली. गदी अलीकडे प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली होती. त्यांचा येथील एक व्हिडिओ एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लीक केला होता. यानंतर प्रियांका व निक एका बोट पार्टीत दिसले होते. या पार्टीत अनेकजण होते. पण प्रियांका व निक यांनी एकमेकांची सोबत सोडलेली नाही. २०१७ मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’ बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती.