Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! ​पूनम पांडेने सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला आंघोळ करतानाचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 11:58 IST

नेहमी वादात राहाणाऱ्या पूनम पांडेने नुकताच एक व्हिडिओ व्हेलेंटाईन डेच्या निमित्ताने पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती कमी कपड्यात तर वावरली आहे. पण त्याचसोबत ती आंघोळ करत असतानाचेदेखील दृश्य या व्हिडिओत आहे.

पूनम पांडेला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलॉविंग आहे. ती नेहमीच इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते. या तिच्या पोस्टना हजारोने लाइक आणि कमेंट्स मिळत असतात. आता नुकताच तिने व्हेलेंटाईन डेचे निमित्त साधून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. कारण या व्हिडिओमध्ये पूनम कमी कपड्यात तर वावरली आहे. पण त्याचसोबत ती आंघोळ करत असतानाचेदेखील दृश्य या व्हिडिओत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला केवळ ब्रा घातलेली पूनम आपल्याला बेडमध्ये पाहायला मिळते आणि त्यानंतर तिला पुष्पगुच्छ देण्यात येतो आणि ती तिच्या आवडीचा नाश्ता करून आंघोळ करायला जाते. व्हेलेंटाईन डे असल्याने ती तिचा संपूर्ण दिवस मौज-मस्ती करण्यात घालवते. ती फिरायला जाते. तसेच चित्रपट पाहायला जाते. हा व्हिडिओ तिने पोस्ट करून केवळ काही तास झाले असले तरी हा व्हिडिओ आतापर्यंत तीन लाखांपेक्षाही अधिक लोकांनी पाहिला आहे. पूनम पांडे हे नाव गेल्या चार-पाच वर्षांत चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. खरे तर पूनम पांडे 2011मध्ये प्रकाशझोतात आली. तिने 2011 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्यावेळी केलेली कमेंट मीडियात प्रचंड गाजली होती. भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला तर मी कपडे काढेन असे विधान त्यावेळी तिने केले होते. त्यानंतर ती अनेक व्हिडिओंमुळे चर्चेत आली. तिने नग्न अवस्थेतील व्हिडिओदेखील अनेकवेळा पोस्ट केले आहेत. आतापर्यंत तिने पोस्ट केलेल्या अनेक हॉट व्हिडिओंना सोशल नेटवर्किंगला खूप कमेंट आणि व्ह्यूच मिळाले आहेत.