OMG ! Paparazziनी आणला दिशा पटनी व टायगर श्रॉफच्या नाकात दम!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 12:02 IST
टायगर श्रॉफचा ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट आज रिलीज झाला. रिलीजच्या आधी या चित्रपटाचा प्रीमिअर पार पडला. मग काय, टायगरच्या ...
OMG ! Paparazziनी आणला दिशा पटनी व टायगर श्रॉफच्या नाकात दम!!
टायगर श्रॉफचा ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट आज रिलीज झाला. रिलीजच्या आधी या चित्रपटाचा प्रीमिअर पार पडला. मग काय, टायगरच्या चित्रपटाच्या प्रीमिअरला दिशा पटनी तर असणारच ना. होय, दिशा पटनी! टायगरची कथित गर्लफ्रेन्ड. ‘मुन्ना मायकल’च्या प्रीमिअरला दिशा एकटी आली नाही तर टायगरसोबत पोहोचली. केवळ टायगर आणि दिशा हे दोघेच नाही तर टायगरची लाडकी बहीण कृष्णा ही सुद्धा या दोघांसोबत होती. टायगर, श्रद्धा आणि कृष्णा या तिघांना एकत्र पाहून पापाराझी स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. मग काय, सगळ्यांचे कॅमेरे सरसावले आणि या तिघांचे फोटो घेण्यासाठी पापाराझी जणू तुटून पडले. यादरम्यान दिशा व टायगरची बहीण कृष्णा या दोघींमध्ये कमालीचे ट्युनिंग दिसून आले. दोघीही हातात हात घालून हसतांना-खिदळतांना दिसल्या. पापाराझींसाठी ही सुद्धा ‘पर्वणी’ म्हणायची की. दोघीही अगदी बिनधास्तपणे कॅमेºयासमोर गेल्या. दिशाने यावेळी फ्लोरोसन्ट कलरचा वनपीस कॅरी केला होता. यात ती कमालीची सुंदर दिसत होती. तर कृष्णाने शॉर्ट स्कर्ट व टॉप कॅरी केले होते. तर टायगर पिंक कलरचा टी-शर्ट आणि जीन्समध्ये होता. या तिघांनीही पापाराझींना पोझ दिल्यात. पण पापाराझींची ‘दिवानगी’ इतकी होती की, ते थेट लिफ्टपर्यंत पोहोचले. होय, दिशा, कृष्णा व टायगरच्या मागोमाग पापाराझींचा जत्था लिफ्टपर्यंत केला. कदाचित हे अतीच, असे समजून दिशा व कृष्णा काहीशा वैतागल्या असाव्यात. मग काय, लिफ्टमध्ये पापाराझींकडे पाठमोरे उभे राहून तिथून पळ काढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मागोमाग टायगरही लिफ्टमध्ये चढला आणि क्षणात लिफ्ट दिसेनासी झाली.