Join us

​OMG!! आता प्रियांका, अनुष्कानंतर दीपिकाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 12:20 IST

होय, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मानंतर आता दीपिका पादुकोणही. नाही ना उलगडा झाला?? तर आम्ही सांगतोय. प्रियांका व अनुष्काच्या पाठोपाठ ...

होय, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मानंतर आता दीपिका पादुकोणही. नाही ना उलगडा झाला?? तर आम्ही सांगतोय. प्रियांका व अनुष्काच्या पाठोपाठ दीपिकाही निर्माती होणार आहे. निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी दीपिका सज्ज झाली आहे. सध्या म्हणे, दीपिका काही स्क्रिप्ट वाचत आहे. यापैकी एखादी स्क्रीप्ट आवडलीच तर कुठल्याही क्षणी दीपिका तिच्या बॅनरच्या चित्रपटाची घोषणा करू शकते. सध्या दीपिका हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये बिझी आहे. पण तरिही स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस काढण्याचा दीपिकाचा इरादा पक्का आहे. लवकरात लवकर प्रॉडक्शन हाऊस सुरु करण्याची तिची योजना आहे. एकंदर काय तर प्रियांका आणि अनुष्का पाठोपाठ दीपिकाही निर्मिती क्षेत्रात नशीब आजमावणार आहे. अनुष्का निर्मित ‘एनएच10’ या सिनेमाचे समीक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते. शिवाय बॉक्स आॅफिसवरही हा चित्रपट हिट ठरला होता. या यशानंतर आता अनुष्का तिच्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘फिल्लोरी’ हा दुसरा सिनेमा घेऊन येत आहे. तिकडे प्रियांकानेही भोजपुरी चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. आता या शर्यतीत दीपिका किती पुढे जाते, ते बघुयात!