Join us

OMG !! ​करण जोहरने लाख मनधरणी करूनही आलिया भट्टने दिला प्रभासची हिरोईन बनण्यास नकार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 12:48 IST

‘बाहुबली’ प्रभासचा ‘साहो’ हा आगामी सिनेमा पाहण्यास प्रत्येकजण उत्सूक आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रभासच्या अपोझिट दिसणार ...

‘बाहुबली’ प्रभासचा ‘साहो’ हा आगामी सिनेमा पाहण्यास प्रत्येकजण उत्सूक आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रभासच्या अपोझिट दिसणार आहे, हे तर तुम्ही जाणताच. पण  या चित्रपटासाठी श्रद्धा नव्हे तर आलिया भट्ट ही मेकर्सची पहिली चॉईस होती,हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.खरे तर या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरआधी अनेक अभिनेत्रींच्या नावांची चर्चा झाली. सर्वात आधी ‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी हिचे नाव समोर आले. पण वाढलेल्या वजनामुळे म्हणा की अन्य कुठल्या कारणामुळे म्हणा, अनुष्काच्या हातून हा चित्रपट हुकला. यानंतर कॅटरिना कैफ, सोनम कपूर, पूजा हेगडे आदींच्या नावांची चर्चा झाली. पण त्यांचीही नावे पिछाडली आणि सरतेशेवटी श्रद्धा या चित्रपटासाठी फायनल झाली. पण आता एक वेगळीच बातमी आहे. सर्वात आधी हा चित्रपट आलियाला आॅफर झाला होता. पण आलियाने म्हणे यास नकार दिला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘साहो’साठी आलिया ही मेकर्सची पहिली चॉईस होती. आलियाचा बॉलिवूड मेंटार करण जोहर हा सुद्धा या चित्रपटात आलिया व प्रभासची जोडी पाहण्यास उत्सूक होता. चर्चा खरी मानाल तर आलियाने ‘साहो’ साईन करावा, यासाठी करणने बरेच प्रयत्न केलेत. त्याने अनेकप्रकारे आलियाचे मन वळवण्याचे प्रयत्न केलेत. पण आलिया आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिने शेवटपर्यंत या चित्रपटाला नकार दिला. आता या नकारामागचे कारण काय तर तिच्या मते, या चित्रपटात प्रभासच्या तुलनेत हिरोईनला करण्यास फार काही नव्हते. अशास्थितीत या चित्रपटात आलियाची भूमिका निव्वळ ‘सपोर्टिंग’ ठरली असती. आलिया सध्या शिखरावर आहे. प्रत्येक चित्रपटात ती लीड रोलमध्ये आहे आणि तिचा प्रत्येक चित्रपट हिट ठरतोय.  त्यामुळे ‘सपोर्टिंग’ भूमिका स्विकारण्यात आलियाचा कुठलाही रस नव्हता आणि म्हणूनच तिने प्रभासला नकार कळवला.  आलियाने नाही म्हटल्यावर मग कुठे श्रद्धाची या चित्रपटात वर्णी लागली. ALSO READ : ​-आणि तिने एक अख्खा दिवस प्रभासला आपल्या पाठीवर मिरवले...! काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरच्या लाईव्ह चॅटमध्ये तुझा आवडता साऊथ अ‍ॅक्टर कोण? असा प्रश्न आलियाला विचारण्यात आला होता. यावर आलियाने क्षणाचाही विलंब न करता प्रभासचे नाव घेतले होते. प्रभाससोबत कामाची संधी मिळाली तर मी कधीही चुकवणार नाही, असेही ती म्हणाली होती. कदाचित ‘साहो’त ही संधी चुकली. पण अशी संधी पुन्हा येणारच नाही, असे मात्र नक्कीच नाही.