Join us
Daily Top 2Weekly Top 5

​OMG!! कंगना राणौत अडचणीत; आदित्य पांचोलीने पाठवली मानहानीची नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 14:46 IST

कंगना राणौतचा ‘सिमरन’ रिलीज झाला आणि तिच्याबद्दलच्या सगळ्या चर्चा थांबल्या असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे.  कारण ...

कंगना राणौतचा ‘सिमरन’ रिलीज झाला आणि तिच्याबद्दलच्या सगळ्या चर्चा थांबल्या असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे.  कारण ताजी बातमी धक्कादायक आहे. होय, कंगनाचा एक्स बॉयफ्रेन्ड आणि त्याची पत्नी झरिना वहाब यांनी कंगनाला मानहानीची नोटिस पाठवली आहे.खुद्द आदित्यने ही माहिती दिली आहे. स्पीडपोस्टद्वारे कंगनाला ही नोटिस पाठवण्यात आली आहे कायदेशीर नोटीस पाठवण्याची ही योग्य प्रक्रिया आहे. कंगनाच्या आरोपानंतर मला जे करायचे होते ते मी केले आहे. आता कंगनाने काय करायला हवे, हे तिचे तिने ठरवाने, असे आदित्यने म्हटले आहे. आदित्यने या प्रकरणात जमीर खान आणि श्रेया श्रीवास्तव या दोन वकीलांचीही नियुक्ती केली आहे.इंडस्ट्रीत नवी असताना कंगना व आदित्य दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पण कालांतराने हे नाते तुटले. तुटले म्हणजे, कंगनानेच तोडले. आदित्य मला प्रचंड मारझोड करायचा. त्याने माझा मानसिक व शारिरीक छळ केला, असा आरोप कंगनाने अलीकडे ‘आप की अदालत’मध्ये केले होते. आदित्यचा त्रास असह्य झाल्याने मी त्याच्या पत्नीला, कॉमन मित्रांना मदत मागितली. पण मला कुणीच मदत केली नाही. अखेर मी पोलिसांत गेले, असा दावाही तिने केला होता.ALSO READ : Don't Miss : ​गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या ‘हटके’ प्रश्नांना, कंगना राणौतचे ‘हटके’ उत्तर!! आदित्यने हे सगळे आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. इतकेच नाही तर कंगना पागल आहे. तिचे काहीच होऊ शकत नाही. एक वेडी व्यक्तीच असे बोलू शकते. मी इंडस्ट्रीत अनेक वर्षांपासून आहे. पण अद्याप कुणीही माझ्याबद्दल असे काही बोललेले नाही. तुम्ही चिखलात दगड फेकाल तर चिखल तुमच्यावरही उडणारच, असे आदित्य म्हणाला होता. तिच्या या आरोपांमुळे माझे कुटुंब दुखावले आहे. मी व माझी पत्नी आम्ही तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही आदित्य म्हणाला होता. त्यानुसार आदित्याने कंगनाविरोधात कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले आहे. आता कंगना याला कसे उत्तर देते, ते बघूच.