Join us

OMG! जग्गा जासूस या चित्रपटात असणार तब्बल २९ गाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 18:29 IST

अनुराग दिग्दर्शित जग्गा जासूस या चित्रपटाची खूपच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे या चित्रपटात एक ...

अनुराग दिग्दर्शित जग्गा जासूस या चित्रपटाची खूपच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे या चित्रपटात एक दोन नाही तर तब्बल २९ गाण्यांचा समावेश आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार हा चित्रपट आहे.  या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वाजणाºया पार्श्वसंगीताने त्यात चार चाँद लावले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे जग्गा जासूसच्या निमित्ताने नव्या प्रकारच्या संगीताचा नजराणा प्रेक्षकांना मिळणार असे अनेकांनाच वाटत होते. याबाबतच चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळणाºया संगीतकार प्रितमने जग्गा जासूस या चित्रपटात तब्बल २९ गाणी असल्याचा खुलासा केला आहे.                     चित्रपटामध्ये २९ गाणी असल्याचे सांगताना प्रितम म्हणाला की या चित्रपटामध्ये रणबीर गाण्याच्या माध्यमातून त्याच्या भावना व्यक्त करताना दिसणार आहे. चित्रपटातील गाणी कथानकाचाच एक महत्त्वाचा भाग आहेत. रणबीर या चित्रपटामध्ये अडखळत बोलणारे एक पात्र साकारणार आहे, जो फक्त गाण्याच्या माध्यमातूनच न अडखळता बोलू शकतो. त्यामुळे जग्गा जासूस या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कतरिना कैफसुद्धा बºयाच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यातही रणबीर आणि तिची आॅनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.हा चित्रपट ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुराग बासू सोबत रणबीरचा हा दुसरा चित्रपट आहे. तसेच रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांची जोडी प्रेक्षकांमध्येदेखील असल्याचे पाहायला मिळत आहे. ही जोडी यापूर्वी अजब प्रेम कीगजब कहानी या चित्रपटात पाहायला मिळाले. या चित्रपटातील गाणीदेखील हीट ठरली आहे. चला तर पाहूयात आता जग्गा जासूस या चित्रपटातील २९ गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का?