Join us

OMG !! इलियाना डिक्रूजची कुणी काढली छेड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 13:26 IST

मुलींची छेड काढण्याचे प्रकार आपल्या अवती-भवती सर्रास होतांना दिसतात. अनेक तरूणी रोड रोमिओंच्या छेडखाणीला बळी पडतात. सेलिब्रिटीही त्याला अपवाद ...

मुलींची छेड काढण्याचे प्रकार आपल्या अवती-भवती सर्रास होतांना दिसतात. अनेक तरूणी रोड रोमिओंच्या छेडखाणीला बळी पडतात. सेलिब्रिटीही त्याला अपवाद नाहीत. होय, बॉलिवूडची बिनधास्त गर्ल इलियाना डिक्रूज हिलाही अशाच छेडछाडीला सामोरे जावे लागले. स्वत: इलियानाने याचा खुलासा केला आहे.स्वत:च्या Twitter अकाऊंटवर इलियानाने ही माहिती दिली. माझ्या आयुष्यात मी सुद्धा छेडछाडीची शिकार ठरलीयं. पण मी नशीबवान आहे की, माझ्या पालकांनी मला कायम पाठींबा दिला. गरज पडेल,त्यावेळी ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, असे इलियानाने आपल्या Twitter  अकाऊंटवर लिहिले. खरे तर एका मुलीच्या पाठींब्यादाखल इलियानाने हे लिहिले. या मुलीने तिच्या बॉयफ्रेन्डचे सगळे मॅसेज सोशल मीडियावर लीक केलेत. कारण तो तिला ब्लॅकमेल करत होता. माझ्याकडे त्याचे मॅसेज लीक करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय उरला नव्हता, असे या मुलीने लिहिले. इलियानाने या मुलीला जोरदार पाठींबा दिला. मी तुझ्या हिमतीची दाद देते, असे इलियानाने लिहिले. शिवाय तिची पोस्ट आपल्या वॉलवर शेअरही केली. यामुळे इलियानाला ट्रोल व्हावे लागले. पण त्याची पर्वा न करता इलियानाने या मुलीचा पाठींबा दर्शवला.इलियानाने याआधीही आपल्या आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी इलियानाने तिचा न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिचा बॉयफ्रेन्ड अँड्यू याने तिचा हा फोटो कॅमे-यात कैद केला होता. अँड्यू स्वत: फोटोग्राफर असल्याने तो इलियानाचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो टिपत असतो.  ALSO READ : अभिनेत्री इलियाना डिक्रुझने एक न्युड फोटो शेअर केला,मात्र कमेंटचा ऑप्शन ब्लॉक केला?पूर्व प्रियकरांशी मैत्री ठेवण्यात इलियानाला नाही रस