Join us

​OMG : ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ दिसणार एकाच चित्रपटात, मात्र दोघांचे ट्विटर वार सुरु !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 14:11 IST

नेहमी विनम्र असणाऱ्या ऋतिक रोशनच्या आज सकाळच्या एका ट्विटने सर्वांना चकित केले. त्याने हे ट्विट टायगर श्रॉफला केले होते ...

नेहमी विनम्र असणाऱ्या ऋतिक रोशनच्या आज सकाळच्या एका ट्विटने सर्वांना चकित केले. त्याने हे ट्विट टायगर श्रॉफला केले होते आणि त्यात त्याने म्हटले होते की, ‘गुरु शेवटी गुरुच असतो आणि शिष्याला तो सर्वकाही शिकवू शकत नाही.’ या ट्विटवरुन असे वाटले की, टायगर श्रॉफ आपल्या सीनियर अ‍ॅक्टरच्या या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. मात्र त्यानेही या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता सनसनीत उत्तर दिले आणि रिट्विट केले की, ‘जेव्हा बाजी पलटेल तेव्हा समजेल.’यावरुन असे वाटत आहे की, ऋतिक रोशन कंगना रानौतनंतर अजून एका विवादात अडकतोय की काय? ऋतिकने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले होते की, ‘गुरु जवळ नेहमी एक डाव असतो जो कधीही आपल्या शिष्याला सांगत नाही.’ }}}}त्याचे हे ट्विट वाचून लगेचच टायगरने शेरास सव्वा शेर असे ट्विट केले, त्यात ‘सर ऋतिक रोशन आपण माझे गुरु आहात, मात्र ही गोष्ट तेव्हा समजेल जेव्हा बाजी पलटेल.’ }}}}विशेष म्हणजे या ट्विटर वारला तेव्हा सुरुवात झाली, जेव्हा यशराज फिल्मने एक प्रोजेक्ट जाहिर केला. यश चोपडाच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन एक गोष्ट जाहिर केली की, त्यांच्या पुढील चित्रपटात ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ दोघेही एकत्र दिसतील. या चित्रपटाचे डायरेक्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत आणि हा चित्रपट २५ जानेवारी, २०१९ रोजी रिलीज होणार आहे. यशराज फिल्मद्वारे दोघांच्या या चित्रपटाच्या बाबतीत ट्विटरवर जाहिर केले आहे. }}}}ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या जोडीला एकत्र पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असेल कारण दोघेही डान्स आणि अ‍ॅक्शनमध्ये मास्टर आहेत. विशेषत: टायगर श्रॉफ ऋतिक रोशनपासून खूपच इन्स्पायरदेखील आहे असेही सांगितले जाते.