Join us

OMG!! ​‘उडता पंजाब’ लीक!! सेन्सॉर बोर्डाचा बदला??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 20:04 IST

‘उडता पंजाब’ विरूद्ध सेन्सॉर बोर्ड हा वाद चांगलाच रंगला. मुंबई उच्च न्यायालयात हा वाद पोहोचला आणि या लढाईत ‘उडता ...

‘उडता पंजाब’ विरूद्ध सेन्सॉर बोर्ड हा वाद चांगलाच रंगला. मुंबई उच्च न्यायालयात हा वाद पोहोचला आणि या लढाईत ‘उडता पंजाब’च्या निर्मात्यांची सरसी झाली, हे तुम्ही जाणताच. आता एक शॉकिंग बातमी म्हणजे, ‘उडता पंजाब’ची सेन्सॉर कॉपी लीक झाली आहे. साहजिकच ‘उडता पंजाब’च्या निर्मात्यांसाठी हा फार मोठा धक्का आहे. कारण यामुळे बॉक्स आॅफिसवरील कमाई प्रभावित होऊ शकते. भारतात पायरसी हा मोठा मुद्दा आहे. पण या प्रकरणात सेन्सॉर बोर्डाकडे अंगुलीनिर्देश केला जात आहे. ‘उडता पंजाब’ची सेन्सॉर कॉपी लीक करण्यामागे पहलाज निहलानी यांच्या अध्यक्षतेखालीलसेन्सॉर बोर्ड तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. आता खरे काय, हे ठाऊक नाही. पण रिलीज ऐन तोंडावर ‘उडता पंजाब’ लीक होणे, हा धक्काच आहे. यापूर्वी ‘सैराट’ या सुपरडुपर हिट चित्रपटाची सेन्सॉर कॉपीही इंटरनेटवर लीक झाली होती...