Join us

OMG!! ​‘जुली2’ची हिरोईन रायलक्ष्मीला कौतुक नको, मग हवे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 10:25 IST

गत शुक्रवारी रिलीज झालेल्या ‘जुली2’ या चित्रपटातून बॉलिवड डेब्यू करणारी अभिनेत्री रायलक्ष्मी हिच्यासाठी सध्या काय महत्त्वाचे असेल? म्हणजे समीक्षकांकडून ...

गत शुक्रवारी रिलीज झालेल्या ‘जुली2’ या चित्रपटातून बॉलिवड डेब्यू करणारी अभिनेत्री रायलक्ष्मी हिच्यासाठी सध्या काय महत्त्वाचे असेल? म्हणजे समीक्षकांकडून होणारे चित्रपटाचे कौतुक की बॉक्सआॅफिसवरची कमाई? रायलक्ष्मीला विचाराल तर, समीक्षकांच्या कौतुकाशी तिला काहीही देणेघेणे नाही. त्याची तिला अजिबात पर्वा नाही. तिला पर्वा आहे ती, तिचा चित्रपट बॉक्सआॅफिसवर किती कलेक्शन करतो त्याची. होय, अलीकडे ‘जुली2’च्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रायलक्ष्मीने ही बाब स्पष्ट केली. मला बॉक्सआॅफिस नंबर्सची फार माहिती नाही. पण सिंगल स्क्रिन प्रेक्षकांना माझा हा चित्रपट नक्की आवडेल. माझ्या मते, सामान्य लोकांमध्ये माझी पोहोच अधिक आहे. आधी लोक माझा चित्रपट कुटुंबासोबत पाहण्याबद्दल संभ्रमात होते. पण नंतर ही इरोटिक फिल्म नाही, हे त्यांना कळले. समीक्षकांनी चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण ठीक आहे. कारण माझा हा पहिला व शेवटचा चित्रपट नाही. समीक्षकांच्या प्रशंसेपेक्षा बॉक्स आॅफिसवरचे कलेक्शन माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे, असे रायलक्ष्मी म्हणाली.ALSO READ : ​केवळ धोनीचं नाही तर आणखी चौघांना डेट करून चुकलीय ‘जुली2’ची ही अभिनेत्री!‘जुली2’ हा चित्रपट २००४ मध्ये आलेल्या ‘जुली’ चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘जुली’मध्ये नेहा धूपिया मुख्य भूमिकेत दिसली होती. राय लक्ष्मीचा जन्म ५ मे १९८९ मध्ये कर्नाटक (बेंगळुरू) येथे झाला. राय लक्ष्मी एक मॉडेल असण्याबरोबरच अभिनेत्रीदेखील आहे. चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे.  राय लक्ष्मीने वयाच्या पंधराव्या वर्षी अभिनयास सुरुवात केली. २००५ मध्ये आलेल्या ‘कारका कसादरा’ या तेलगू चित्रपटातून तिने डेब्यू केला. त्यानंतर तिने बºयाचशा तामिळ चित्रपटांमध्ये काम केले.   पुढे २००७ मध्ये तिने मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली. त्यामुळे तिला एकापाठोपाठ एक चित्रपटांच्या आॅफर्स मिळत गेल्या.