OMG ! ‘हे’ बॉलिवूड स्टार्स यंदा खेळणार नाहीत होळी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2017 14:59 IST
संपूर्ण बॉलिवूड होळीच्या रंगात न्हाले असताना, काही सेलिब्रिटी मात्र यंदा होळीच्या रंगांपासून दूर राहणार आहेत. अर्थात यामागची कारणे वेगवेगळी ...
OMG ! ‘हे’ बॉलिवूड स्टार्स यंदा खेळणार नाहीत होळी!!
संपूर्ण बॉलिवूड होळीच्या रंगात न्हाले असताना, काही सेलिब्रिटी मात्र यंदा होळीच्या रंगांपासून दूर राहणार आहेत. अर्थात यामागची कारणे वेगवेगळी आहेत. बॉलिवूडमध्ये बच्चन कुटुंबाची होळी फेमस आहे. पण यंदा बच्चन कुटुंबाने होळी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ बच्चन यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचे वडील कृष्णाराज राय हे गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यामुळे बच्चन कुटुंबानेयंदा रंगपंचमी सादरी करायची नाही, असे बच्चन परिवाराने ठरवले असल्याचे म्हटले जात आहे. बच्चन कुटुंबासह शाहरूख खान व अक्षय कुमार हे दोघेही होळी खेळणार नाहीयेत. शाहरूखच्या डाव्या खांद्यावर शस्त्रक्रिया झालीय. डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिलाय. याऊलट अक्षय कुमार ‘पॅडमॅन’च्या शूटींगसाठी मध्यप्रदेशला रवाना होण्याची शक्यता आहे. अर्जुन कपूर आणि अनिल कपूर सध्या लंडनमध्ये आहे. ‘मुबारका’च्या शूटींगमध्ये दोघेही बिझी आहे. त्यामुळे त्यांची होळी लंडनमध्येच असणार आहे. अथिया शेट्टी ही सुद्धा या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तिची होळी सुद्धा लंडनमध्येच होणार आहे.कॅटरिना कैफ ‘टायगर जिंदा है’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. कदाचित सलमान खानही या चित्रपटाच्या शूटींगमुळे होळीपासून दूर राहू शकतो. टायगर श्रॉफला तसेही होळी खेळणे आवडत नाही. तो ‘मुन्ना मायकल’च्या शूटींगमध्ये बिझी असणार आहे. त्यामुळे यंदा टायगर होळीपासून दूर राहणार आहे. जॅकलिन फर्नांडिस हिला रंग खेळायला मनापासून आवडतात. पण सध्या जॅक तिच्या ‘ड्राईव्ह’ सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे यंदाची होळी ती मिस करणार आहे.