Join us

या अभिनेत्रीने अजय देवगणमुळे आत्महत्या करण्याचा केला होता प्रयत्न, हे होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 06:00 IST

रवीनाला 'मोहरा' सिनेमा मिळाला तिची अक्षय कुमारसह जवळीक वाढली आणि अजयला विसरत ती अक्षय कुमारच्याही प्रेमात पडली

आपल्या आवडत्या कलाकाराच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी रसिक फार उत्सुक असतात. त्यांच्या जीवनातील प्रत्येक घडामोडींवर रसिकांचं बारीक लक्ष असते. विशेषतः त्यांचं अफेअर आणि लग्न याबाबत जाणून घेण्याची रसिकांना विशेष उत्सुकता असते. बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. 

 

बॉलिवूडमध्ये सध्या अजय देवगण आणि रवीना टंडन यांच्या एकेकाळी गाजलेल्या अफेअरची चर्चा होत आहे. काजोलची अजयच्या आयुष्यात एंट्री होण्या आधी अभिनेत्री रवीना टंडन अजयच्या प्रेमात पडली होती. त्याकाळी या दोघांचे अफेअरव तुफान चर्चा रंगायच्या. मात्र हे प्रेम अजयला कधीच मान्य नव्हते.  रवीना अजयच्या प्रेमात एवढी वेडी झाली होती की, तिनं त्याला मिळवण्यासाठी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. 

अजय आणि रवीना यांनी 'दिलवाले' सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्याचवेळी रवीना अजयच्या प्रेमात पडली होती. मात्र या नात्याला सुरूवात होण्याआधीच त्याचा 'द एंड' झाला होता. कारण त्याचवेळी अजय करिश्माच्या प्रेमात होता. अजयचे करिश्माबद्दलचे प्रेम पाहून रवीना डिप्रेशनमध्येही गेली होती. त्यावेळी रवीनाचे प्रेम अजयसाठी त्रासदायकही ठरले होते.  इतकेच नाही तर अजयने तिला फसवल्याचा आरोप रवीनाने  केला होता. तर अजयनेही रवीनाचा हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगितले होते.

 तसेच रवीनासह प्रेम तर सोडा मैत्री नसल्याचे अजयने म्हटले होते. त्यानंतर रवीनाला 'मोहरा' सिनेमा मिळाला तिची अक्षय कुमारसह जवळीक वाढली आणि अजयला विसरत ती अक्षय कुमारच्याही प्रेमात पडली मात्र हे नातेही फार काळ टिकले नाही.  

टॅग्स :अजय देवगणरवीना टंडन