Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG...! कॉलेजच्या दिवसात तुरूंगाची हवा खाऊन आलाय बॉलिवूडचा हा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 15:52 IST

विद्यार्थी दशेत असताना बॉलिवूडच्या या अभिनेत्याला खावी लागली होती तुरूंगाची हवा

द कपिल शर्मा शो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यावेळेसचा द कपिल शर्मा शो स्पेशल होता. यावेळी कुमार विश्वास, पंकज त्रिपाठी व मनोज वाजपेयी पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शोमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी याने सांगितलं की तो सात दिवस तुरूंगात राहून आला आहे.

कपिल शर्माने बातचीत दरम्यान पंकज त्रिपाठीला विचारलं की, कॉलेजच्या दिवसात तू सात दिवस जेलची हवा खाऊन आला आहेस, अशी अफवा आहे. त्यावर पंकज त्रिपाठी म्हणाला की, हो. मी विद्यार्थी राजकीय संघटनेत होतो. त्यावर कपिल म्हणाला की, राजकारणात जायची आयडिया कुठून आली? त्यावर पंकज म्हणाला कीस जेव्हा तुम्ही तरूण असता तेव्हा कुठे ना कुठे जाण्याची इच्छा होते. हे ऐकून सगळे जोराजोरात हसू लागले.

पंकज त्रिपाठी याने याआधीदेखील सांगितलं की, कॉलेजमध्ये शिकत असताना तो तुरूंगाची हवा खाऊन आला आहे. सुपर ३० चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पंकज म्हणाला की, विद्यार्थी दशेत असताना आंदोलन करत असताना एक आठवड्यासाठी मला जेलमध्ये टाकलं होतं. जेलमध्ये खाण्या पिण्याचं ठीक होतं मात्र बाहेरचं जग पाहता येत नाही. मग तुम्ही बाहेरच्या जगाच्या कल्पना करू लागता. तिथे करायला काहीच नव्हते. त्यामुळे त्यादरम्यान मी पुस्तके वाचत होतो आणि तिथून पुस्तक वाचण्याची आवड माझ्यामध्ये निर्माण झाली.

टॅग्स :पंकज त्रिपाठीद कपिल शर्मा शोकपिल शर्मा