OMG !! आयशा टाकियाने केला लिप जॉब...ओळखणेही झाले कठीण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 15:27 IST
आयशा टाकिया दीर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. अर्थात कुठल्याशा चित्रपटामुळे नाही तर तिच्या ...
OMG !! आयशा टाकियाने केला लिप जॉब...ओळखणेही झाले कठीण!!
आयशा टाकिया दीर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. अर्थात कुठल्याशा चित्रपटामुळे नाही तर तिच्या बदललेल्या चेहºयामुळे. आयशाला तुम्ही आता पाहाल तर कदाचित ओळखूही शकणार नाही. होय, अलीकडे आयशा एका इव्हेंटमध्ये पोहोचली तेव्हा तिला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. अनेकांनी तर तिला ओळखले देखील नाही. सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल झालेत, यावरून आयशाने आपल्या ओठांची सर्जरी केलीय, हे स्पष्टपणे जाणवते. या सर्जरीमुळे आयशाचा पाऊट आणि फेसकट पूर्णपणे बदलून गेलाय. आधी आयशा क्यूट दिसायची. पण या सर्जरीनंतर तिचे ओठ चांगलेच जाड झालेले आहेत. त्यामुळे ती बरीच विचित्र दिसायला लागलीय. किमान आम्हाला तरी असेच वाटतेय. आधी आयशा क्यूट दिसायची. पण या सर्जरीनंतर तिचे ओठ चांगलेच जाड झालेले आहेत आयशा चित्रपटात येण्यासाठी उत्सूक आहे. आपल्या कमबॅकसाठी आयशाने जोरदार तयारी चालवली असल्याचे कळते. गतवर्षी आयशाने एक म्युझिक व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ लवकरच रिलीज होणार आहे. कदाचित याचसाठी आयशाने ही सर्जरी केली असावी. ही सर्जरी करणारी आयशा एकटी अभिनेत्री नाही. अशा सर्जरीनंतर अनेक अभिनेत्रींच्या चेहºयात बदल झालाय. अनुष्का शर्मा त्यापैकीच एक़ अनुष्काने ओठांची सर्जरी केली होती, तेव्हा तिच्या बदललेल्या लूकची बरीच टर उडवली गेली होती.आयशाने वयाच्या पंधरा वर्षांपासून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. हिंदी चित्रपटांशिवाय साऊथच्या चित्रपटांमध्येही ती दिसली होती. सलमानसोबत ‘वॉन्टेड’ अािण अजय देवगणसोबत ‘टार्जन द वंडर कार’ या चित्रपटात आयशा झळकली होती. यानंतर २००९ मध्ये आयशाने लग्नाचा निर्णय घेतला व २०११ मध्ये चित्रपटांना रामराम ठोकला. त्यावर्षी ‘मोड’ या चित्रपटात आयशाच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते. पण आता आयशा पुन्हा एकदा चित्रपटात परतण्यासाठी सज्ज झाली आहे.