Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG ! कधी बनला ऋषी, कधी राक्षस...कोण आहे रामायणातील हा मल्टी टॅलेंटेड अभिनेता?   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 15:57 IST

मीम्सचा पूर...

रामानंद सागर यांचे रामायण सध्या प्रचंड चर्चेत आहेत. रामायणात भूमिका साकारणारे कलाकारही तितकेच चर्चेत आहेत. अगदी मालिकेतील प्रत्येक कलाकाराला शोधले जात आहे. राम, रावण, सीता, लक्ष्मण, भरत, कैकयी, दशरथ अशा अनेक लहान-मोठ्या भूमिका साकारणा-या कलाकारांचा शोध सुरु आहे. अशात रामायण मालिकेतील एक कलाकार सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. हा कलाकार कोण तर अभिनेता असलम खान. असलम खान यांनी रामायण मालिकेत अनेक साईड रोल साकारले. कधी ते ऋषी बनले, कधी मुनी, कधी दूत, कधी राक्षस, कधी समुद्र देव तर कधी वानर सेनेतील वानर.

असलम यांनी केवळ रामायण या मालिकेतच नाही तर कृष्णा, अलिफ लैला या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या. ‘ये हवाएं’ ही त्यांची शेवटची मालिका, 2002 मध्ये त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला होता.

असलम खान यांच्या मुलाने मानलेत आभार

रामायण पुन्हा प्रसारित केल्याबद्दल असलम यांचा मुलगा जैगम खान याने रामायणच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. डीडी नॅशनलवर रामायण पुन्हा टेलिकास्ट केल्याबद्दल आभार. माझे वडील असलम खान यांनी या शोमध्ये अनेक सपोर्टींग रोल साकारले, असे त्याने लिहिले आहे.

असा होता प्रवासअसलम यांना अभिनयात कुठलाही इंटरेस्ट नव्हता. रेल्वेच्या असिस्टंड ड्रायव्हर पदासाठी त्यांना कॉल लेटरही आले होते. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रायव्हेटमध्ये नोकरी करण्याचा सल्ला दिला. यानंतर असलम यांनी अकाऊंटशी संबंधित अनेक लहानमोठ्या नोक-या केल्यात. एकदिवस ते आपल्या मित्रासोबत ‘विक्रम बेताल’च्या सेटवर गेले. याठिकाणी असलम यांनी एक लहानसार रोल केला. हा त्यांचा पहिला शॉट होता. यानंतर त्यांना रामायण मालिकेत संधी दिली. रामायणात त्यांनी एक नाही तर डझनावर रोल केलेत. पण 33 वर्षांत त्यांना कधीच कुणी नोटीस केले नाही. पण आता मात्र पहिल्यांदा लोकांच्या नजरेत भरले.

मीम्सचा पूर...तूर्तास असलम खान सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. त्यांच्यावरचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. पाहुया एक झलक...

 

टॅग्स :रामायण