Join us

OMG! अभिषेक बच्चनने खोटी रिंग देऊन केलं होतं ऐश्वर्याला प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 12:22 IST

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा सिल्वर स्क्रिनवर एकत्र काम करण्यास सज्ज झाला. मिळालेल्या माहितीनुसार फँटम फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या 'गुलाब जामून' सिनेमात दोघे एकत्र दिसणार आहेत.

ठळक मुद्देअभिषेक आणि ऐश्वर्याने आतापर्यंत आठ सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहेअभिषेकने 2007मध्ये ऐश्वर्याला गुरू सिनेमाच्या सेटवर प्रपोज केले होते

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा सिल्वर स्क्रिनवर एकत्र काम करण्यास सज्ज झाला. मिळालेल्या माहितीनुसार फँटम फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या 'गुलाब जामून' सिनेमात दोघे एकत्र दिसणार आहेत. रियल लाईफ रिल लाउफमध्ये सुद्धा हे कपल तेवढेच ग्लॅमरस आहे.  

अभिषेकने 2007मध्ये ऐश्वर्याला गुरू सिनेमाच्या सेटवर प्रपोज केले होते. प्रपोज करताना अभिषेकने जी रिंग ऐश्वर्याला दिली होती ती खोटी होती. सिनेमाच्या दरम्यान हिच रिंग अभिषेकने ऐश्वर्याला दिली होती. टॉरेंटोवरून गुरूच्या प्रीमियरवरुन परतल्यानंतर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते.   

अभिषेक आणि ऐश्वर्याने आतापर्यंत आठ सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे.'उमराव जान', 'ढाई अक्षर प्रेम के', 'रावण' व 'सरकार राज' यांसारख्या चित्रपटात एकत्र काम करून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यानंतर आता अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या 'गुलाब जामून' सिनेमात अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी पाहायला मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. सर्वेश मेवाडा हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून दोन वर्षांपूर्वीच चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी काही कारणांमुळे ऐश्वर्या आणि अभिषेकने एकमेकांसोबत काम करायला नकार दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र लवकरच हे दोघे चित्रपटाच्या  शूटिंगला सुरुवात करतील असे समजते आहे. गुलाब जामून चित्रपटाच्या निमित्ताने या 'रिअल लाईफ' कपलला 'रिल लाईफ'मध्ये पुन्हा एकदा रोमान्स करताना पाहायची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सध्या अभिषेक बच्चन 'मनमर्जिया' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे तर ऐश्वर्या राय 'फन्ने खान' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या दोघांना इतक्या वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन