Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओम पुरींचाही तोल सुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 13:39 IST

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी मात्र वेगळाच सूर आवळला ...

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी मात्र वेगळाच सूर आवळला आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबद्दल काहीसे ‘कृतघ्न’ विधान करून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. जवानांना सैन्यात जायला आम्ही सांगितलं होतं का ? त्यांना शस्त्र उचलण्यास कोणी सांगितलं ? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर चित्रपट निमार्ता संघटनेने पाकिस्तानी अभिनेत्यांवर बंदी घातली आहे. याच विषयावर एका वृत्तावाहिनीवरील चर्चेदरम्यान ओम पुरी यांनी हे वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले. पाकिस्तानी कलाकार व्हिसा घेऊन भारतात येतात, असे सांगत ओम पुरी यांनी पाकी कलाकारांची बाजू घेतली. तुम्ही पाकिस्तानी कलाकारांची बाजू का घेतायं? असा उलट सवाल यानंतर त्यांना करण्यात आला. यावर मात्र ओमपुरी चांगलेच संतापले. जवानांना सैन्यात जायला आम्ही सांगितलं होतं का ? त्यांना शस्त्र उचलण्यास कोणी सांगितलं ? असे प्रतिप्रश्न ओम पुरी यांनी मुलाखत घेणाºयास विचारले. इतकेच नाही तर   तर 15 ते 20 लोकांचं आत्मघाती पथक तयार करा आणि पाकिस्तानला पाठवून स्फोट घडवून आणा असेही ते म्हणाले. भारत - पाकिस्तानचं इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनसारखं व्हावं आणि लढत राहावं अशी तुमची इच्छा आहे का ? भारतामध्ये करोडो मुस्लिम राहतात त्यांना युद्धासाठी डिवचू नका. भारत पाकिस्तानचं विभाजन फक्त देशांचे नाही तर कुटुंबांचेही विभाजन होते. अनेक भारतीयांचे नातेवाईक पाकिस्तानात राहतात, त्यांच्याशी ते युद्ध कसे करणार, असेही ते म्हणाले. ओम पुरी यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावरुन प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडमधूनही ओम पुरी यांच्या वक्तव्यावर टीका करण्यात येत असून अभिनेते परेश रावल आणि अनुपम खेर यांनी खेद व्यक्त केला आहे.