Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी रियासोबतचे ते फोटो; आता व्हायरल होतोय महेश भट व जिया खानचा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 11:04 IST

पाहून बसेल धक्का...

ठळक मुद्दे8 जूनला सुशांतचे घर सोडल्यानंतर रियाने महेश भट यांना मेसेज केले होते. या मॅसेजचे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली होती.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेली त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट यांचे व्हाट्स अ‍ॅप चॅट अलीकडे व्हायरल झाले होते. 8 जूनला सुशांतचे घर सोडल्यानंतर रियाने महेश भट यांना मेसेज केले होते. या मॅसेजचे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली होती. त्याआधी रिया व महेश भट यांचे फोटोही व्हायरल झाले होते. आता महेश भट यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत महेश भट जिया खानसोबत दिसत आहेत. जिया खानने 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

याच जिया खानसोबतचा महेश भट यांचा व्हिडीओ अचानक व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महेश भट जियाच्या अगदीच जवळ बसलेले दिसत आहेत. कधी ते जियाला मिठीत घेताना दिसतात तर कधी तिचा हात पकडताना दिसतात. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्स महेश भट यांना जबरदस्त ट्रोल करत आहेत.

सुशांत सिंग मृत्यूप्रकरण सीबीआयकडे जाण्याच्या काही दिवस आधी जियाची आई राबिया यांनी एक पोस्ट लिहून महेश भट यांच्यावर निशाणा साधला होता. ‘जिया व सुशांतचे नार्सिस्टिक क्रिमिनल पार्टनर्सचे बॉलिवूड माफिया आणि नेत्यांशी संबंध आहेत. राजकीय दबावामुळे सत्याची गळचेपी होतेय. डिप्रेशनच्या कहाणीच्या प्रचारासाठी हे लोक महेश भट यांना अँकरसारखे वापरतात,’ असे राबिया आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या.

रियाने महेश भट यांना केले होते असे मेसेज..

८ जून रोजी सुशांतचे घर सोडल्यानंतर रियाने महेश भट यांना मेसेज केला होता की, ‘आयशा पुढे निघाली आहे सर, जड मन आणि एका शांततेसोबत. तुमच्यासोबत बोलल्यानंतर  माझे डोळे उघडले गेले. तुम्ही माझ्यासाठी देवदूत आहात. तुम्ही तेव्हाही होते आणि आजही आहात’. एका दुस-या मेसेजमध्ये रियाने लिहिले की, ‘तुम्ही मला पुन्हा आझाद केलेय.’ रियाला  महेश भट यांनी उत्तर दिले की, ‘आता मागे वळून बघू नकोस. तुझ्या वडिलांना माझ्याकडून प्रेम दे. आता ते फार आनंदी होतील’.

टॅग्स :महेश भटरिया चक्रवर्ती