Join us

कंगणाच्या मैत्रिणींनी शेअर केल्या जुन्या आठवणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 10:42 IST

मित्रमैत्रिणींसमोर कशाच ‘स्टारडम’ आणि कशाच काय... मित्रमैत्रीणींसमोर आपण कितीही मोठे झालो तरीही त्यांच्याप्रमाणेच असतो. सेलिब्रिटी असले तरीही त्यांचेही काही ...

मित्रमैत्रिणींसमोर कशाच ‘स्टारडम’ आणि कशाच काय... मित्रमैत्रीणींसमोर आपण कितीही मोठे झालो तरीही त्यांच्याप्रमाणेच असतो. सेलिब्रिटी असले तरीही त्यांचेही काही जुने दिवस होते ज्यावेळी ते बॉलीवूडमध्ये फार संघर्षाचे जीवन जगत होते.पण, आज मात्र, कंगणाच्या मैत्रिणी तसेच काहीसे ‘फील’ करत आहेत. कंगणा राणावत आज एक मोठी सेलिब्रिटी आणि अभिनेत्री झाली आहे. पण, ती पूर्वी सर्वसामान्य मुलींसारखीच होती. तिच्या रूममेट्स मैत्रिणींनी तिचे त्यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.सध्या कंगणाचे हृतिक रोशनसोबतच्या गाजत असलेल्या प्रकरणाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,‘ आम्ही ‘कन्नू’ ला खुप पूर्वीपासून ओळखतो. ती खुपच दुरदृष्टी असलेली मुलगी असून चांगली व्यक्ती देखील आहे.खुप हार्डवर्किंगही आहे. कसल्याही वाईट सवयी नव्हत्या. आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी, हुशार अशी ती आहे. ’