‘ओके जानू’ मध्ये शाहरूख पाहुण्या रूपात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 11:03 IST
श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर हे सध्या करण जोहरच्या ‘ओके जानू’ चित्रपटासाठी शूटींग करत आहेत. यात शाहरूख खान ...
‘ओके जानू’ मध्ये शाहरूख पाहुण्या रूपात...
श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर हे सध्या करण जोहरच्या ‘ओके जानू’ चित्रपटासाठी शूटींग करत आहेत. यात शाहरूख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा ‘बी’ टाऊनमध्ये सुरू आहे.करण जोहरने शाहरूख खानला विनंती केली की,‘चित्रपटाच्या मध्यांतरामध्ये त्याने खास भूमिकेत एन्ट्री करावी.’ शाहरूख आणि आदित्य प्रथमच एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करतील.तसेच गौरी शिंदे यांच्या आगामी चित्रपट ‘डिअर जिंदगी’ मध्ये शाहरूख-आलियासह आदित्य देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. पाहूयात, आता शाहरूख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत कसा दिसतो ते!