एकाच चेहऱ्याच्या आणि सेम टू सेम दिसणाऱ्या सात व्यक्ती जगात असतात असे म्हटले जाते. सेलिब्रिटींचे तर अनेक डुप्लिकेट आपण पाहिले आहेत. अशाच सेम टू सेम दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये आता अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचाही उल्लेख करावा लागला. काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा व जॅकलिन फर्नांडिस यांचेही ड्युप्लिकेट असल्याचे पहायला मिळाले.
ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याच्या चर्चा सगळीकडे होत असते. मात्र आता तिच्यासारखी दिसणारी व्यक्ती नुकतीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ही व्यक्ती ईराणी मॉडेल असून तिचे नाव महलाघा जबेरी असे आहे. महलाघाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत.
ईराणी मॉडेल महलाघाचा जन्म १७ जून, १९८९मध्ये ईराणमधील इस्फहान शहरात झाला.
महलाघा फिटनेस फ्रिक असून फिटनेससाठी ती योगाला प्राधान्य देते आणि ती न चुकता दररोज योगा करते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे इंस्टाग्रामवर २.३ मिलियन म्हणजे २३ लाख फॉलोवर्स आहेत.
महलाघाचा जन्म ईराणमध्ये झाला असला तरी मॉडेलिंग करियरमुळे ती अमेरिकेतील सैन डिएगोमध्ये राहते. ती मॉडेलिंग व्यतिरिक्त घोडेस्वारीची आवड आहे. याशिवाय महलाघाला रिकाम्या वेळेत शॉपिंग करायला आवडते.