Join us

अरे बापरे... ! शाहिद कपूर दिवसभरात ओढायचा २० सिगरेट, जाणून घ्या यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 19:22 IST

शाहिद कपूरचा आगामी चित्रपट कबीर सिंगचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर खऱ्या आयुष्यात ड्रिंक किंवा स्मोक करत नाही. मात्र कबीर सिंग चित्रपटात शाहिदने दारूड्या सर्जनची भूमिका केली आहे. जो दारू, सिगरेट व कोकेनच्या नशेत बुडलेला असतो. शाहिद कपूरला ही भूमिका साकारणे सोप्पे नव्हते. कबीर सिंगसाठी शाहिदने खूप मेहनत घेतली आहे.

कबीर सिंग चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शाहिद दारूच्या नशेत बुडालेल्या सर्जनच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी शाहिदने उडता पंजाब चित्रपटात ड्रग्सच्या अधीन झालेल्या रॉकस्टारची भूमिका साकारली आहे. मात्र शाहिदने या चित्रपटासाठी वजन वाढविले आहे आणि ओबडधोबड शेफमध्ये पहायला मिळतो आहे. 

शाहिदने सांगितले की, तो स्मोकिंग अजिबात करत नाही. परंतु कबीर सिंगच्या भूमिकेसाठी त्याला खूप स्मोक करावे लागले. हे माझ्यासाठी सोप्पे नव्हते. एकवेळी अशी आली की दिवसभरात वीस सिगारेट पित होतो. सिगरेटचा वास येईल म्हणून सेटवरून घरी जाण्यापूर्वी दोन तास आंघोळ करायचो. 

शाहिद कपूरने त्याचा फिट फोटो आणि कबीर सिंगसाठी बनवलेली शरिरयष्टीच्या फोटोचे कोलाज करत लिहिले की, एका कलाकाराला स्वतःला खूप चांगले सादर करावे लागते. मात्र एका अभिनेत्याला स्वतःला सर्वात वाईट अवस्थेत टाकण्यासाठीदेखील हिम्मत पाहिजे. कबीर सिंग माझ्या रक्तात आहे. तुम्हाला देखील याची प्रचिती येईल, अशी मला आशा आहे.कबीर सिंग चित्रपटाची कथा अशा एका व्यक्तीची आहे जो पेशाने डॉक्टर आहे. पण, थोडा सनकी आहे आणि आदर्शदेखील. कबीर सिंग एक वेडा प्रेमी आणि एक विद्रोही देखील आहे. कबीर सिंग हा २०१७ साली प्रदर्शित झालेला तेलगू ब्लॉकबास्टर चित्रपट अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक आहे. या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन संदीप वांगा यांनी केले आहे. हा चित्रपट ३१ जूनला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :शाहिद कपूर