Join us

'O Zaalima' : पाहा, शाहरूख खान व माहिरा खानचा हॉट रोमान्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 16:18 IST

Shahrukh Khan Romances Mahira Khan in Zaalima :Shahrukh Khan : Mahira Khan : 'O Zaalima' ‘रईस’चे दुसरे गाणे रिलीज झालेय. ‘ओ जालिमा’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात शाहरूख माहिरा खान हिच्यासोबत रोमान्स करताना दिसतोय.

शाहरूख खानचा ‘रईस’ हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीस येतो आहे. अलीकडे ‘रईस’चे ‘लैला मैं लैला...’ हे गाणे रिलीज झालेत. यात शाहरूख व बॉलिवूडची ग्लॅम डॉल सनी लिओनी या दोघांची हॉट केमिस्ट्री तुम्ही पाहिलीत. आता ‘रईस’चे दुसरे गाणे रिलीज झालेय. ‘ओ जालिमा’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात शाहरूख माहिरा खान हिच्यासोबत रोमान्स करताना दिसतोय.माहिरा व शाहरूख यांची केमिस्ट्री पहिल्यांदाच पडद्यावर पाहायला मिळतेय. ‘ओ जालिमा’ गाण्यात माहिरा व शाहरूख यांच्यात बरेच रोमॅन्टिक सीन्स आहेत.   शाहरूख तर तसाही ‘रोमान्सचा बादशहा’ आहे. या गाण्यात त्याचा हाच अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अरिजीत सिंह  आणि हर्षदीप कौर याच्या आवाजातील या गाण्याचे शब्द आहेत, जावेद अख्तर यांचे.यापूर्वी आलेले ‘रईस’चे ‘लैला मैं लैला’ हे गाणे बरेच हिट झाले. आता ‘ओ जालिमा’ तुम्हाला आवडतं का ते बघा! तेव्हा बघू यात शाहरूख व माहिराच्या आॅनस्क्रीन रोमान्सची ही झलक़..राहुल ढोलकिया दिग्दर्शित हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होतोय. बॉक्सआॅफिसवर हृतिक रोशनच्या ‘काबील’शी याचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. राहुल ढोलकिया दिग्दर्शित आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर व गौरी खान निर्मित या चित्रपटात शाहरूख, माहिरा खानसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे.. या सिनेमात दारूबरोबरच अवैधरीत्या शस्त्रास्त्रांची तस्करी करणारा गॅँगस्टर  अब्दुल लतीफ याची कथा दाखविण्यात येणार असल्याचे बोलले जाते. मात्र शाहरूखने असे काहीही नसून हा चित्रपट पूर्णत: काल्पनिक असल्याचे म्हटले आहे.