Join us
Daily Top 2Weekly Top 5

O Romeo Box Office: शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो' सिनेमाने पहिल्या दिवशी किती पैसे कमावले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 09:36 IST

गँगस्टर ड्रामा आणि रोमान्सचे मिश्रण असलेल्या ओ रोमियो चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, जाणून घ्या

शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेला आणि विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'ओ रोमियो' हा चित्रपट शुक्रवारी, १३ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. गँगस्टर ड्रामा आणि रोमान्सचे मिश्रण असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ तरीही चांगली सुरुवात केलेली दिसली.

पहिल्या दिवशी किती झाली कमाई?

इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, 'ओ रोमियो'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अंदाजे ७ ते ८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट एक 'डार्क' गँगस्टर थ्रिलर असल्याने, अशा प्रकारच्या सिनेमासाठी ही सुरुवात चांगली मानली जात आहे. शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग'सारखी ही ओपनिंग नसली, तरी विशाल भारद्वाज यांच्या मागील चित्रपटांच्या तुलनेत ही आकडेवारी सकारात्मक आहे.

चित्रपटसृष्टीतील जाणकारांना अपेक्षा होती की, हा चित्रपट पहिल्या दिवशी १० कोटींहून अधिक (Double Digit) कमाई करेल. मात्र, सकाळी आणि दुपारच्या शोमध्ये प्रेक्षकांची संख्या थोडी कमी दिसून आली. संध्याकाळच्या आणि रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. आता शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी हा चित्रपट १० कोटींचा टप्पा सहज ओलांडेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सोशल मीडियावर चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शाहिद कपूरच्या 'हुसैन उस्तारा' या भूमिकेचे आणि त्याच्या जबरदस्त अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुसरीकडे, विशाल भारद्वाज यांची दिग्दर्शन शैली काहींना आवडली तर काही प्रेक्षकांना संथ वाटली. तृप्ती डिमरीच्या अभिनयानेही प्रेक्षकांची मने जिंकली असून तिची आणि शाहिदची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरत आहे.

येत्या काळात चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी 'वर्ड ऑफ माउथ' अत्यंत महत्त्वाचे ठरेल. चित्रपट १५० कोटींहून अधिक बजेटमध्ये तयार झाला असल्याची चर्चा आहे, त्यामुळे एकूण खर्च भरून काढण्यासाठी चित्रपटाला पहिल्या आठवड्यात मोठी कमाई करावी लागेल. 'ओ रोमियो' हा चित्रपट १९९५ च्या काळातील मुंबईतील गँगस्टर संस्कृतीवर आधारित असून त्यात भरपूर ॲक्शन बघायला मिळणार आहे. आता या विकेंडला चित्रपट किती कमाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : O Romeo Box Office: Shahid's film opens with decent collection.

Web Summary : Shahid Kapoor's 'O Romeo' earned approximately ₹7-8 crore on its opening day. While not a 'Kabir Singh' level opening, it's positive compared to Vishal Bhardwaj's past films. The film needs strong word-of-mouth to sustain its box office run.
टॅग्स :शाहिद कपूरबॉक्स ऑफिस कलेक्शननाना पाटेकरतृप्ती डिमरीबॉलिवूड