९०च्या दशकात इंडस्ट्रीतील सदाबहार अभिनेत्री रेखा आणि काजोल यांनी एक बोल्ड फोटोशूट केले होते, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली होती. आता २९ वर्षांनंतर, त्यांचे हे फोटोशूट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण काजोलची लाडकी लेक नीसा देवगणने तिचा मित्र ओरीसोबत तोच लूक रीक्रिएट केला आहे. या दोघांच्या फोटोंनी आता सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.
ओरीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो नीसा देवगणसोबत दिसत आहे. त्यानंतर दोघे एकमेकांचा मेकअप करताना दिसले. व्हिडीओमध्ये नीसाने सांगितले की, ती तिच्या आईची म्हणजेच काजोलची भूमिका साकारत आहे, तर ओरी म्हणाला की, तो रेखाच्या भूमिकेत आहे. हे सांगून दोघांनी कॅमेऱ्यासमोर हुबेहूब तसेच पोझ दिले, जसे रेखा आणि काजोलने ९०च्या दशकातील त्यांच्या फोटोशूटमध्ये दिले होते.
सेलेब्स आणि युजर्सच्या प्रतिक्रियाओरी आणि नीसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. अभिनेत्री मलायका अरोराने यावर कमेंट करत 'लव्ह धिस..' असे लिहिले आहे, तर गायिका कनिका कपूर म्हणाली, 'फेव्हरेट कोलॅब..'. काही युजर्स हा व्हिडिओ पाहून नीसाला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा सल्ला देतानाही दिसले.
१९९६ साली रेखा आणि काजोलने केलेलं फोटोशूटरेखा आणि काजोलने १९९६ मध्ये एका मॅगझिनसाठी हा फोटोशूट केला होता. त्यावेळचा त्यांचा हा लूक पाहून सगळेच थक्क झाले होते आणि इंडस्ट्रीत या फोटोशूटमुळे खूप खळबळ माजली होती. काजोलने अभिनेता अजय देवगणशी लग्न केले आहे. हे जोडपे नीसा आणि युग देवगण या दोन मुलांचे पालक आहेत. नीसा तिच्या लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते.
Web Summary : Nysa Devgan and Orry recreated Rekha and Kajol's 90s photoshoot, causing a social media stir. Nysa played Kajol, and Orry played Rekha. Celebrities and users reacted positively to the video, praising the collaboration and suggesting Nysa consider Bollywood.
Web Summary : न्यासा देवगन और ओरी ने रेखा और काजोल के 90 के दशक के फोटोशूट को रीक्रिएट किया, जिससे सोशल मीडिया पर हलचल मच गई। न्यासा ने काजोल की भूमिका निभाई, और ओरी ने रेखा की। वीडियो पर हस्तियों और यूजर्स ने सकारात्मक प्रतिक्रिया दी, सहयोग की सराहना की और न्यासा को बॉलीवुड में विचार करने का सुझाव दिया।