"विक्टरी आर्ट"च्या मुलांचे नृत्यसादरीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 17:31 IST
“विक्टरी आर्ट फाऊंडेशन” ही संस्था शरिरीकदृष्ट्या अपंग मुलांसाठी काम करते. या संस्थेत ही मुलं स्वत: सादरीकरण करतात. अंधत्व, बहिरेपणा ...
विक्टरी आर्टच्या मुलांचे नृत्यसादरीकरण
“विक्टरी आर्ट फाऊंडेशन” ही संस्था शरिरीकदृष्ट्या अपंग मुलांसाठी काम करते. या संस्थेत ही मुलं स्वत: सादरीकरण करतात. अंधत्व, बहिरेपणा असलेली, व्हीलचेअरवर असणारी अशा अनेक मुलांना शामक दावर व त्याचे प्रशिक्षक नृत्यामर्फत सबलीकरणाचे धडे देतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विक्टरी आर्ट फऊंडेशनमधील ही मुलं आपली नृत्यकला सर्वांसमोर सादर करणार आहेत. यावेळी संस्थेतील जवळपास 200 ते 250 मुलं परफॉर्म करणार आहेत. ऐकू न येता किंवा दिसत नसतानाही उत्तम पद्धतीने नृत्य सादरीकरण करणे तसेच व्हिलचेअरवर आपली कला सादर करणे हेच “विक्टरी आर्ट फाऊंडेशन”चे मुख्य आकर्षण असते. ज्या अपंग मुलांना समाजात एका ओझ्याप्रमाणे वागणूक दिली जाते अशी मुले इथे आपले महत्त्व पटवून देतात. शामक दावर यांनी 2004मध्ये “विक्टरी आर्ट फाऊंडेशन”ची सुरूवात केली. इथे शारिरीकदृष्ट्या अपंग तसेच रेड लाईट भागात वाढलेली मुले देखील आपली नृत्यकला सादर करतात. समाजाकडून दिल्या जात असलेल्या वागणुकीमुळे या मुलांचा आत्मविश्वास वाढणे हे अत्यंत गरजेचे असते. नेमके हेच ओळखून शामकने या सर्वांना एकत्र आणत त्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 25 ऑक्टोबरला ही मुलं बांद्र्यात एका कार्यक्रमात नृत्य सादरीकरण करणार आहेत. 21 ते 23 वर्षांच्या या मुलांना घरचा फार आधार नाही. अशा परिस्थितीत विक्टरीचा आधार त्यांना मिळाल्याने नृत्य क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याचे स्वप्न व सत्य एकत्रितपणे शामकने दाखवले आहे. गेल्या 3 वर्षांपासून विक्टरीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.यामार्फत या महत्त्वाकांक्षी मुलांना आपल्या स्वप्नांना साकारता येते.