बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिने नुकतीच उज्जैनमधील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी तिने भस्म आरतीत सहभाग घेतला आणि शिवलिंगावर जलार्पण करून दर्शन घेतले. मात्र, तिची ही भक्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी नुसरतच्या भक्तीवर आक्षेप घेतलाय. त्यांनी नुसरतला 'शरियतची दोषी' ठरवत लक्ष्य केलंय.
मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "नुसरत भरुचानं उज्जैनमधील महाकाल मंदिरात गेली, प्रार्थना केली, जल अर्पण केलं आणि तिथल्या धार्मिक परंपरांचे पालन केले. इस्लाम या सर्व कृत्यांना परवानगी देत नाही. हे इस्लामच्या पूर्णपणे विरोधात आहे. शरियत अशा गोष्टींना परवानगी देत नाही. नुसरत भरुचाने धर्माच्या नियमांचे उल्लंघन केले असून ती गंभीर पापाची दोषी बनली आहे".
मौलानांनी केवळ टीकाच केली नाही, तर नुसरत भरुचाला यातून बाहेर पडण्यासाठी मार्गही सुचवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "नुसरतने आपल्या कृत्याबद्दल देवाकडे माफी मागावी आणि पश्चात्ताप करावा. तिने 'इस्तिगफर' आणि 'कलमा' पठण करावे. पश्चात्ताप हाच या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे".
शिवभक्त आहे नुसरत भरुचा
दरम्यान, नुसरत भरुचा ही महादेवाची मोठी भक्त आहे. ती अनेकदा प्रसिद्ध मंदिरे आणि धार्मिक स्थळांना भेट देत असते. याआधीही तिने केदारनाथ आणि बद्रीनाथ या धार्मिक स्थळांना भेट दिली आहे. शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत नुसरत भरुचाने हिंदू देवावरील श्रद्धेबद्दल आपले विचार व्यक्त केले. अभिनेत्रीने सांगितले की ती मुस्लिम असूनही, तिची महादेवावर खूप श्रद्धा आहे. तिने १६ शुक्रवार संतोषी मातेचे व्रत देखील ठेवले आहे.
Web Summary : Nushrratt Bharuccha's visit to Mahakal temple sparked controversy. Maulana Razvi criticized her devotion, deeming it against Islamic principles. He urged repentance and adherence to Sharia.
Web Summary : नुसरत भरुचा के महाकाल मंदिर जाने पर विवाद। मौलाना रजवी ने उनकी भक्ति की आलोचना करते हुए इसे इस्लामी सिद्धांतों के खिलाफ बताया। उन्होंने पश्चाताप करने और शरिया का पालन करने का आग्रह किया।