Join us

आता ‘बाहुबली’चाही मेणाचा पुतळा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 17:23 IST

अनेक कलाकारांचे मादाम तुसादमध्ये मेणाचे पुतळे तयार केलेले आहेत. मग, त्यात बाहुबली तरी मागे कसा राहील? दाक्षिणात्य अभिनेता प्रभास ...

अनेक कलाकारांचे मादाम तुसादमध्ये मेणाचे पुतळे तयार केलेले आहेत. मग, त्यात बाहुबली तरी मागे कसा राहील? दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याचाही आता मेणाचा पुतळा तयार करण्यात येणार आहे.प्रभास हा पहिला दाक्षिणात्य अभिनेता असणार आहे ज्याचा मादाम तुसाद येथे मेणाचा पुतळा तयार करण्यात येणार आहे. दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी ही माहिती टिवटरवर शेअर केले आहे की,‘व्हेरी हॅप्पी टू अनाऊंस दॅट मादाम तुसाद इज मेकिंग अ वॅक्स स्टॅच्यु आॅफ अवर प्रभास...फर्स्ट साऊथ इंडियन टू बी आॅनर्ड धस.’तसेच बँकॉकमध्ये या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. हैदराबादमध्ये बाहुबली चित्रपटाची टीम शूटींग करत आहे. नोव्हेंबरमध्ये चित्रपटाचे शूटींग पूर्ण होणार आहे.