Join us

आता राखी सावंतने शेअर केली तिची लग्नपत्रिका, ह्या व्यक्तीसोबत अडकणार लग्नबेडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 18:43 IST

राखी सावंतने इंस्टाग्रामवर एक निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे,

ठळक मुद्देराखी सावंत दीपक कलालसोबत करणार विवाहहा विवाह सोहळा ३१ डिसेंबला लॉस अँजेलिसमध्ये पार पडणार

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. दीपिका व रणवीर यांचे लग्न नुकतेच पार पडले. मात्र त्यांचे रितीरिवाज अद्याप संपलेले नाहीत. प्रियांका चोप्रा व निक जोनास यांची लग्नातील रिवाजाला नुकतीच सुरूवात झाली आहे. यादरम्यान कपिल शर्मानेदेखील सोशल मीडियावर आपल्या लग्नाची पत्रिका शेअर केली. त्यानंतर आता नेहमी वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारी राखी सावंतने देखील इंस्टाग्रामवर लग्नाची पत्रिका शेअर केली आहे.राखीने इंस्टाग्रामवर निमंत्रण पत्रिका शेअर केली ज्यानुसार ती कॉमेडीयन दीपक कलालसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या निमंत्रण पत्रिकेनुसार त्यांचा विवाह सोहळा ३१ डिसेंबला लॉस अँजेलिसमध्ये पार पडणार आहे. दीपक कलालने देखील इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे.

दीपक कलाल सोशल मीडियावर लोकप्रिया आहे. सध्या तो रिएलिटी शो इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये झळकतो आहे. राखीने दीपकचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि त्यात लिहिले की, खूप छान... आपण लग्नानंतर बिग बॉस १३, नच बलिये व झलक दिखला जा या रिएलिटी शोमध्ये सहभागी होऊयात आणि मला वाटते आपणच जिंकणार.

 

काही दिवसांपूर्वी राखी सावंतने तनुश्री दत्ता प्रकरणावर विधान करून वादात अडकली होती. त्यानंतर मीटू मोहिमेअंतर्गत राखी नाना पाटेकर यांना सातत्याने समर्थन करणारे विधान करत होती. नुकतेच ती एका रेसलिंग कार्यक्रमात गेली होती आणि तिथे महिला कुस्तीपटून आव्हान केल्यानंतर ती रिंगणात उतरली होती. त्यावेळी महिला कुस्तीपटूने तिला आपटले होते. त्यानंतर तिला रुग्णालयात जावे लागले होते.राखीने अचानक लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे सध्या त्याची जोरदार चर्चा होते आहे. आता राखीच्या लग्नाची चर्चा किती काळ रंगते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.  

टॅग्स :राखी सावंत