...आता ‘इंदू सरकार’ला खेचले सर्वोच्च न्यायालयात !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 22:46 IST
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वादाच्या भोवºयात सापडत असलेला ‘इंदू सरकार’ हा चित्रपट आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. स्वत:ला संजय ...
...आता ‘इंदू सरकार’ला खेचले सर्वोच्च न्यायालयात !
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वादाच्या भोवºयात सापडत असलेला ‘इंदू सरकार’ हा चित्रपट आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. स्वत:ला संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणाºया प्रिया पॉल यांनी दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या ‘इंदू सरकार’ या चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ‘इंदू सरकार’विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वास्तविक ‘इंदू सरकार’ला सेन्सॉर बोर्डाने काही कट लावल्यानंतर हिरवा झेंडा दाखविला होता. परंतु आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याने, रिलीजवर रोख लावण्यात येईल काय? याविषयी उलटसुलट चर्चा रंगत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रिया पॉल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. प्रियाने त्यांच्या याचिकेत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे अशी मागणी केली होती. त्यांचे म्हणणे होते की, जोपर्यंत मधुर भंडारकर चित्रपटातील फॅक्चुअल पार्ट डिलीट करणार नाही, तोपर्यंत चित्रपट रिलीज केला जाऊ नये. यावर मधुर भंडारकर यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेत प्रियाकडे संजय गांधी यांची मुलगी असल्याचा पुरावा मागितला होता; मात्र त्यांनी अद्यापपर्यंत अशाप्रकारचा पुरावा दिलेला नाही. दरम्यान, प्रिया आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने न्यायालय यावर कशा पद्धतीने निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला तेव्हापासूनच मधुर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सातत्याने काही ना काही अडथळ्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे. काही कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी तर त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. तर काहींनी फलकबाजी करीत मधुर भंडारकर यांचा निषेध नोंदविला आहे. काही दिवसांपूर्वीच मधुर भंडारकर पुण्यात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते, परंतु कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची पत्रकार परिषद उधळून लावली होती. अशाच प्रकारचा त्यांना नागपुरातही सामना करावा लागला होता. काही कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी तर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा मधुर यांनी दावा केला होता. परंतु मधुर यांनी या धमक्यांना न जुमानता चित्रपट प्रदर्शित करण्यावर भर दिला. चित्रपट प्रदर्शनासाठी संरक्षण मागविणार असल्याचेही त्यांनी ‘सीएनएक्समस्ती’शी बोलताना म्हटले होते.