Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आता मी तुरुंगात आहे...", शाहरुख खानने पत्रकाराला फोनवर असं का म्हटलं होतं?, जाणून घ्या हे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 08:56 IST

Shah Rukh Khan : शाहरुख खानने अनेकवेळा चित्रपटांमध्ये गुंडांना तुरुंगात पाठवले आहे, पण प्रत्यक्षात त्याला एक पूर्ण दिवस पोलिस कोठडीत काढावा लागला होता.

सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या तीन दशकांपासून आपल्या चित्रपटांमधून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. लोक त्याच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुख खान जरी एक साधा माणूस आहे आणि त्याला अनावश्यक मारामारीपासून दूर राहणे आवडते, परंतु तुम्हाला माहिती आहे का की एकदा त्याने असे काही केले होते ज्यामुळे पोलिसांनी त्याला सुरू असलेल्या शूटिंगच्या मध्येच उचलले होते.  हो ही घटना शंभर टक्के खरी आहे. आज २ नोव्हेंबरला शाहरुख खानचा वाढदिवस आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला किंग खानशी संबंधित या सत्य घटनेबद्दल सांगत आहोत.

तुम्ही लोकांनी शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर अनेकदा तुरुंगात जाताना पाहिलं असेल, पण एकदा त्याला पूर्ण दिवस पोलीस स्टेशनमध्ये काढावा लागला होता. खुद्द अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान या घटनेबद्दल सांगितले होते. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण? खूप पूर्वी खुद्द शाहरुख खानने डेव्हिड लेटरमॅनच्या शोमध्ये खुलासा केला होता की, एका मॅगझिनमध्ये त्याच्याबद्दलचा एक लेख प्रसिद्ध झाला होता, ज्यामुळे तो खूप संतापला होता. संतापून त्याने मॅगझिनच्या संपादकाला फोन लावला. संपादकाने शाहरुखला प्रत्युत्तर दिले की हा लेख विनोद म्हणून घ्या, तो फक्त विनोद होता.

संपादकाशी घेतलेला पंगा आला अंगाशीशाहरुख खानने सांगितले की, त्याचा संयम सुटला आणि मग तो मॅगझिनच्या ऑफिसमध्ये पोहोचला. तिथे त्याने खूप शिवीगाळ केली, पण प्रकरण तिथेच संपले नाही तर आणखी वाढले. या घटनेनंतर शाहरुख खान चित्रपटाचे शूटिंग करत असताना पोलीस तेथे पोहोचले आणि त्याला सोबत येण्यास सांगितले. शाहरुखला वाटले की पोलीस आपले चाहते आहेत. त्यामुळे ते त्याला भेटायला सेटवर आले होते, पण काही वेळाने शाहरुखला समजले की मॅगझिनच्या संपादकाच्या तक्रारीवरून पोलीस त्याला अटक करायला आले आहेत.

'आता मी तुरुंगात आहे पण घाबरत नाही'त्याने पुढे सांगितले की तो पोलिसांसोबत निघून गेला. त्यावेळी शाहरुख खानने पहिल्यांदा छोटा सेल पाहिला होता. तिथे खूप घाण होती. शाहरुख खानला संपूर्ण दिवस पोलिस कोठडीत काढावा लागला. मात्र, त्याला जामीन मिळाला आणि मग त्याने संपादकाला फोन करून सांगितले की. 'आता मी तुरुंगात आहे आणि मला अजिबात भीती वाटत नाही, पण आता तुम्ही नक्कीच घाबराल.'

 

टॅग्स :शाहरुख खान